पुणे, 20 जून 2022: कोरोनानंतर आता पुन्हा नवनवीन क्षेत्र उभारी घेत असताना सॅाफ्टवेअर इंडस्ट्री मागं नाही. याच पाश्वभूमीवर आता पुण्यात हिंजवडी येथे रॅाकवेल ॲाटोमेशन या सॅाफ्टवेअर डेव्हलपमेंट सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं. हे केंद्र रॉकवेल ऑटोमेशनची जागतिक संशोधन व विकास क्षमता वाढवते आणि स्थानिक व जागतिक ग्राहकांना त्यांच्या डिजिटल परिवर्तन प्रवासामध्ये मदत करण्यासाठी स्मार्ट उत्पादन सॉफ्टवेअर विकसित करेल. उत्पादन व्यवस्थापन, अभियांत्रिकी यासारख्या क्षेत्रात अनेकांना रोजगार दिला आहे. संशोंधन, विकास वाढवण्यावर रॅाकवेलचा भर असून जागतिक गरजेनुसार सॅाफ्टवेअर विकसीत करण्यावर काम करणार आहे.
तसेच एसडीसी कर्मचाऱ्यांना आव्हानात्मक उत्पादन विकास क्षेत्रात काम करण्याची संधी देण्यासोबत जगभरातील टीम्स व ग्राहकांशी शेअर करण्याची व त्यांच्याकडून शिकण्याची संधी देखील देईल.
रॉकवेल ऑटोमेशनच्या सॉफ्टवेअर इंजीनिअरिंग, सॉफ्टवेअर व कंट्रोलचे संचालक मार्टिन डिटमर म्हणाले, ”आम्हाला भारतात सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट सेंटरचं उद्घाटन करण्याचा अभिमान वाटतो. हे स्थानिक व जागतिक बाजारपेठ गरजांची पूर्तता करणारी सॉफ्टवेअर उत्पादनं निर्माण व विकसित करण्यासाठी जागतिक दर्जाचे केंद्र आहे. यामधून भारताची डिजिटलायझेशनमधील क्षमता दिसून येते आणि देशामध्ये गुंतवणूक करणाऱ्या व ‘मेक इन इंडिया’ राष्ट्रीय उपक्रमामध्ये सहभाग घेणाऱ्या जागतिक कंपनीचे उत्तम उदाहरण आहे.”
रॉकवेल ऑटोमेशनचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप साहनी म्हणाले, ”भारत रॉकवेल ऑटोमेशनसाठी महत्त्वाची बाजारपेठ आहे आणि आमचा सॉफ्टवेअर विकास क्षेत्रामध्ये प्रगती करत राहण्याचा मनसुबा आहे. पुण्यातील नवीन एसडीसी आम्हाला आमची संशोधन व विकास क्षमता वाढवण्यामध्ये आणि जागतिक मानकांनुसार सॉफ्टवेअर उत्पादनं विकसित करण्यामध्ये सहाय्य करेल. आमच्या स्थानिक टीम्स वाढवण्याकरिता भारतातील उच्च कुशल सॉफ्टवेअर टॅलेंट चा लाभ घेत आमच्या क्षमता अधिक वाढवण्याची आमची योजना आहे. असंही त्यांनी नमूद केलं.
पुणे हे विद्येचं माहेरघर आहे, असं म्हणणारे पुणे आता सॅाफ्टवेअरचं माहेरघर होत आहे. असचं म्हणावं लागेल.
न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस