इंदापूर तालुक्यातील रुई येथे विविध विकासकामांचे उदघाटन…

6

इंदापूर, ४ डिसेंबर २०२०: इंदापूर तालुक्यातील रुई येथे विविध विकासकामांचा उदघाटन समारंभ पार पडला. मौजे रूई येथे मोहन लावंड यांच्या घरापासून – रामा दादा वस्ती या रस्त्याचं खडीकरण करण्याच्या कामाचा भूमिपूजन समारंभ मा. बांधकाम व आरोग्य समिती सभापती प्रविण माने यांच्या शुभहस्ते पार पडला.

माने यांच्या सभापती फंडातून ९ लाख रुपयांच्या निधीतून हे विकास कार्य पूर्णत्वास जाणार असून कामाच्या गुणवत्तेबाबत मी स्वतः जातीनं लक्ष देणार असल्याचं प्रतिपादन यावेळी प्रविण माने यांनी केलं.

याचसह तालुक्यातील रूई येथील प्रसिद्ध देवस्थान श्री क्षेत्र बाबीर येथे भगत बांधव येथे सामाजीक सभामंडप उभारणीच्या कामाचाही शुभारंभ माने यांच्या शुभहस्ते पार पडला. प्रविण माने यांच्या बांधकाम सभापती फंडातून ५ लाख रुपयांच्या निधीतून हे कार्य पूर्णत्वास जाणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा