पाटेठाण, २९ ऑगस्ट २०२०: पाटेठाण ता. दौंड येथील ग्रामपंचायतीच्या वतीने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत विविध शालेय विकासकामांचे उदघाटन करण्यात आले असल्याची माहिती सरपंच वैशाली गुंड यांनी दिली.
ग्रामपंचायतीच्या वतीने शालेय गरज असलेल्या विविध विकासकामांसह भोसलेवाडी आणि उंडवडी जिल्हा परिषद शाळेसाठी प्रत्येकी तीन हजार रुपये किंमतीचे एलसीडी संच भेट देण्यात आले. तसेच चांगल्या दर्जाच्या नवीन वर्गखोल्या बांधकामासाठी भोसलेवाडी आणि उंडवडी शाळेसाठी प्रत्येकी सात लाख रुपये देण्यात आले. या विविध विकासकामांचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे, ग्रामसेविका मीना उबाळे, उपसरपंच विकास सोनवणे, सदस्य सतीश लोहकरे, इंदुबाई जाधव, मयुरी कांबळे, अश्विनी जाधव, राजेंद्र सणस, मुख्याध्यापक ठोंबरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल कुल, तंटामुक्ती अध्यक्ष सचिन गुंड, दिनेश गडदे, पोलीस पाटील राजेंद्र जगताप, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: