‘डब्ल्यू-२०’, ‘जी-२०’ परिषदेचे केंद्रीय महिला व बाल विकासमंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते उद्घाटन

छ्त्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : जी-२० शिखर परिषदेच्या ‘वूमन – २०’ बैठकीचा मान छत्रपती संभाजीनगरला (औरंगाबाद) मिळाला आहे. परिषदेचे उद्घाटन २७ फेब्रुवारीला हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे केंद्रीय महिला व बाल विकासमंत्री स्मृती इराणी यांच्या उपस्थितीत झाले. जी-२० परिषदेच्या सहकार्याने व केंद्र सरकारच्या वतीने छत्रपती संभाजीनगरात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय पातळीवरील महिला २० परिषद भरविण्यात येणार आहे. सोमवारी सकाळी ९.३० ते ११ वाजेदरम्यान उद्घाटन समारंभ पार पडला. ‘डब्ल्यू २०’च्या अध्यक्ष आणि संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्ष डॉ. संध्या पुरेचा यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या बैठकीच्या उद्घाटन सोहळ्याला केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. उद्घाटनानंतर ‘सूक्ष्म, लघू आणि स्टार्टअप्स उद्योगात महिलांचे सक्षमीकरण’ या विषयावर सकाळी ११.३० ते सायंकाळी ७.३० पर्यंत चर्चासत्र होईल. या समारोपाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अभिनेत्री रविना टंडन यांची उपस्थिती राहणार आहे. त्यानंतर पाहुण्यांसाठी ताज हॉटेल येथे वेलकम डिनर आयोजित केले आहे.

जी-२० अंतर्गत असलेल्या डब्ल्यू-२० परिषदेसाठी जगभरातून १५० महिला शहरात दाखल झाल्या आहेत. या जी-२० परिषदेत १९ देश आणि युरोपीय संघांचा समावेश आहे.

११ पाहुणे शनिवारी सायंकाळी शहरात दाखल झाले. उर्वरित पाहुणे रविवारी (ता. २५) दाखल झाले होते. या बैठकीची प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली. हॉटेल रामा येथे २७ आणि २८ फेब्रुवारी या दोन दिवसांत विविध सत्रांमध्ये जी-२० च्या महिला धोरणांवर चर्चा केली जाणार आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : विनोद धनले

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा