लोणी काळभोर येथे मित्राबरोबर शरीर संबंधास नकार दिल्याने पत्नीस मारहाण केल्याची घटना..!

लोणी काळभोर २४ ऑक्टोबर २०२०:घरच्यांच्या विरोधात जाऊन अवघ्या चार महिन्यापूर्वी प्रेमविवाह केलेल्या नवविवाहितेस मद्यपी पतीने मित्राबरोबर शारीरिक संबंध ठेवायला सांगितले, यास तिने नकार दिल्याने पती व त्यांच्या मित्राने तिला लोखंडी पाइप, पट्टा, व हाताने मारहाण केल्याची धक्कादायक घटना लोणी काळभोर येथे घडली पोलिसांनी पती व त्यांचे मित्र अशा ४ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी १९ वर्षीय पीडित नवविवाहितेने दिलेल्या माहिती वरून श्रीधर अशोक कदम रा. सहजपूर ता. दौंड, विशाल माने, तानाजी शिंदे, करण खडसे, विशाल माने, ( पूर्ण नाव पत्ता माहित नाही ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित विवाहितेने घरच्यांच्या विरोधात जाऊन २२ जून रोजी देवाची आळंदी येथे प्रेमविवाह केला होता.

त्यानंतर ते लोणी काळभोर परिसरात राहात होते व तो ड्रायव्हर म्हणून काम करतो परंतु सध्या कोरोनामुळे त्यांचा रोजगार गेला त्याला दारूचे व्यसन आहे. त्याचे मित्र सुरज कांबळे, व तानाजी शिंदे, करण खडसे, विशाल माने, हे दारू घेऊन यायचे व त्याच्या बरोबर घरातच दारू प्यायचे ती याला विरोध करत असल्याने पती तिला मारहाण करायचा सोमवार दि. १९ रात्री ९ च्या सुमारास दोघे घरी असताना माने व शिंदे दारूच्या बाटल्या व मटन घेऊन आले ती स्वयंपाक करायला लागली तोपर्यंत हॉलमध्ये सर्व दारू पीत बसले रात्री दहाच्या सुमारास सर्वांनी जेवण केले अकराच्या सुमारास ती किचन मध्ये भांडी घासत असताना माने व शिंदे हे तेथे आले व तीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले आहे.

तिने नकार दिल्याने पतीने लोखंडी पाईपने पायावर हातावर मारहाण केली, तर मित्रांनीही तिला मारहाण केली आहे. असे पीडित महिलेने बोलताना सांगितले आहे. व पतीसह मित्रावर लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी- ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा