माणुसकीला काळीमा फासणारी घटना, गरोदर गाईला चारली स्फोटके

14

हिमाचल प्रदेश, दि. ६ जून २०२०: केरळच्या मलप्पुरममध्ये स्फोटक खाण्यामुळे गर्भवती हत्तीणीचा मृत्यू झाल्यानंतर हिमाचल प्रदेशातूनही असेच धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. हिमाचल प्रदेशातील बिलासपूर जिल्ह्यातील झांडुटा भागात एका गर्भवती गाईला स्फोटकांचा गोळा बनवून खायला घातले गेले, ज्यामुळे गाय गंभीर जखमी झाली आहे.

गायीच्या मालकाने या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला आहे, जो खूपच व्हायरल होत आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे. या घटनेमुळे लोकांमध्ये प्रचंड संताप आहे.

बिलासपूरचे एसपी दिवाकर शर्मा यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, ही स्फोटके गव्हाच्या पिठाच्या एका गोळ्यात ठेवली गेली होती, जेव्हा गाईने हा पिठाचा गोळा चावला त्यावेळेस त्यामधील स्फोटके फुटली आणि गायीचा जबडा जखमी झाला.

क्रूरता प्रतिबंधक कायद्याच्या कलम २८६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी व इतर लोकांच्या भूमिकेचा तपास केला जात असल्याचेही ते म्हणाले.

सूत्रांनी सांगितले की, शेतकरी आपल्या शेतातील पीक खाणाऱ्या वन्यप्राण्यांना पळवून लावण्यासाठी शेतात पिठाच्या गोळ्या मध्ये स्फोटके ठेवतात. या स्फोटांमुळे वन्यप्राणी पिकांच्या जवळ येत नाहीत. नाव न सांगण्याच्या अटीवर बोलताना एका वन अधिकाऱ्याने सांगितले की, शिकारीसुद्धा वन्य डुकरांना मारण्यासाठी असेच तंत्र वापरत असतात , परंतू कधीकधी पाळीव प्राणी आणि पाळीव गुरे अशा युक्तींना बळी पडतात. यापूर्वी स्फोटक खाण्यामुळे गर्भवती हत्तीचा मृत्यू

न्यूज अनकट प्रतिनिधी