फलटण २७ मे २०२३ : जपान येथे होणाऱ्या महिला हॉकी ज्युनियर एशिया कप २०२३ साठी नुकतीच भारतीय महिला हॉकी संघाची घोषणा झाली असून त्यात फलटण तालुक्यातील वैष्णवी फाळके आणि ऋतुजा पिसाळ या दोन खेळाडूंची निवड झाली आहे. महिला हॉकी जुनिअर एशिया कप २०२३, २ ते ११ जून २०२३ रोजी जपान येथे होणार आहे. त्यासाठी हॉकी इंडियाने १८ सदस्यीय महिला हॉकी संघ जाहीर केला आहे.
महिला हॉकी जुनिअर संघ : प्रीती ( कर्णधार ), दीपिका( उपकर्णधारदार ), माधुरी किंडो, अदिती माहेश्वरी, महिमा टेटे, नीलम, रोपनी कुमारी, अंजली बरवा, वैष्णवी फाळके, ऋतुजा पिसाळ, मंजू चोरसिया, ज्योति छत्री, सुजाता कुजूर, मनश्री नरेंद्र शेडगे, मुमताज खान, दीपिक सोरेंग, अन्नू, सुनलिता टोप्पो यांचा समावेश आहे.
अ गटात भारतीय महिला हॉकी संघाचा पहिला सामना ३ जून रोजी उजबेकिस्थान बरोबर, तर ५ जून रोजी मलेशिया, ६ जून रोजी कोरिया त्यानंतर चीन टाईपी बरोबर होणार आहे. ११ जून रोजी अंतिम सामना होणार आहे. वैष्णवी फाळके, ऋतुजा पिसाळ यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : आनंद पवार