ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांचे निधन !

ब्राझील, ३० डिसेंबर २०२२ : ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले. मागील काही दिवसांपासून ते साओ पाउलोच्या रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होते. ब्राझीलला तीन वेळा वर्ल्डकप मिळवून देणारे पेले हे एकमेव खेळाडू होते. त्यांनी १९५८, १९६२ आणि १९७० अशी तीन विजेतेपद मिळवली आहेत.

https://twitter.com/ANI/status/1608542302372519936?s=19

पेले यांची मुलगी केली नॅसिमेंटो हिने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट करत ही माहिती दिली आहे. ‘आम्ही जे काही आहोत त्यासाठी तुमचे आभारी आहोत. आम्ही तुझ्यावर असीम प्रेम करतो, असे कॅप्शन लिहित केलीने सर्व कुटुंबियांचा हात पेले याच्या हाताजवळ असल्याचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोवर जगभरातील फुटबॉलप्रेमी कमेंट करत असून सर्व स्तरातून पेले यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.

  • २०२१ पासून प्रकृती ढासळली

पेले यांना कोलोरेक्टर कन्सर झाला होता. प्रकृती खालवल्यामुळे त्यांना ३० नोव्हेंबर रोजी साओ पाउलो येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याआधी सप्टेंबर २०२१ मध्ये त्यांना ट्यूमर असल्याचे समोर आले होते. पेले यांच्या कोलनमध्ये ट्यूमर होता. तेव्हापासून ते हॉस्पिटलमध्ये ये-जा करू लागले.

  • फुटबॉलचे देव गेले!

ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांना फुटबॉल जगताचा अनभिषिक्त सम्राट मानले जात होते. जगभरातील चाहते त्यांना अगदी फुटबॉलचा देव, ‘किंग’ पेले किंवा ‘ब्‍लॅक पर्ल’ असे म्हणत. फिफाने देखील पेले यांना महान खेळाडूचे लेबल दिले होते. ते त्यांच्या काळातील सर्वात यशस्वी फुटबॉलपटू मानले जात. कारण त्यांनी एक-दोन नाही तर तब्बल तीन वेळा विश्वचषक जिंकवून दिला होता. त्यांच्यामुळेच ब्राझील हा सर्वात यशस्वी फुटबॉल संघ म्हणून जगासमोर आला. गोल करण्याची त्याची क्षमता अद्वितीय होती. आपल्या कारकिर्दीत क्लब, आंतरराष्ट्रीय फुटबॉल अशा सर्वात मिळून पेले यांनी जवळपास १२८२ गोल मारले होते.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा