बारामती, ८ ऑक्टोबर २०२०: जागतिक कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आपण इतर आजारांकडे आपले दुर्लक्ष होते आहे. कोरोना विषाणूबाबत ज्याप्रमाणे नागरीकांनी व शासनाने सतर्कता दाखविली त्याच पद्धतीने सध्या आपल्या दारात येऊन ठेपलेल्या डेंगू संसर्गापासून सावधान राहण्याची गरज आली आहे. कोरोना अदृश्य शस्त्रू होता मात्र, डेंग्यू हा दृश्य शत्रू आहे. त्याचा प्रसार रोखण्यासाठी खबरदारी गराजेची आहे.
शहरात डेंगू विषाणूजन्य रोगाचे रुग्ण संख्येत वाढ होत असुन हा आजार डासांद्वारे पसरतो. एन्डी इजिप्ती डासाने डेंगू विषाणू एका व्यक्तीकडून दुसर्या व्यक्तीमध्ये प्रसारीत होतो. यामुळे उच्च-ताप येणे, तीव्र डोके दुखी, मळमळणे, डोळ्यांच्या मागे दुखणे, सांधेदुखी, थकवा येणे, शारिरीक वेदना होणे, भूक न लागणे, त्वचेवर पुरळ येणे ही लक्षणे दिसू लागतात. या संसर्गात ताप आणि इतर लक्षणे एक आठवडा राहतात. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुका स्तरावर पंचायत समिती, नगरपरिषद, ग्रामपंचायतीचे सर्व विभागांनी काम केले.
आरोग्य विभागाचे काम चांगले झाले आता डेंगू होऊ नये म्हणून आरोग्य खात्याने आपला परिसर स्वच्छ कसा राहील हे पाहणे गरजेचे आहे. मोकळे प्लॉट त्याठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. सांडपाणी साठण्याची ठिकाणे, पाण्याच्या टाकीवर झाकण बसवणे घरात, गच्चीत, पोटमाळ्यात जुने टायर, येथे अंडी घालतात. त्यामुळे येथे फवारणी करून परिसर निर्जंतुकीकरण केले पाहिजे. अशी मागणी बारामतीकर करत आहेत.
न्युज अनकट प्रतिनिधी – अमोल यादव