केडीएमसीची बससेवा वापरणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ!

डोंबिवली, २ सप्टेंबर २०२०: कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप तरी कल्याण डोंबिवलीमध्ये कमी झालेला नाही . कल्याण डोंबिवली रोज कोरोना रूग्णांची संख्या ही २०० ते ४०० च्या घरात आहे , मात्र सरकारच्या नियमानूसार कल्याण डोंबिवली नित्यनियमाने सर्वच गोष्टी या सूरू झाल्या आहेत . मात्र कल्याण डोंबिवली चालणारी केडीएमसीची बससेवा ही सध्या नागरिकांसाठी मदतीचा हात म्हणून आली आहे.

कल्याण डोंबिवलीतील खोणी , शिरडोण ,लोढा या परिसरातून अनेक व्यापारी तसेच अनेक रानमेवा विकणाऱ्या महिला या स्टेशन परिसरात येतात आणि या प्रवासासाठी कल्याण डोंबिवली महानगर पालिकेची बस ही उत्तम आणि सोईसकर पर्याय आहे त्यामुळे या बसचा वापर हा मोठ्या प्रमाणात होत आहे . या अश्या परिस्थीतीत रिक्षा ,टॅक्सीचे भाडे वाढल्याने रोजचे येणे जाणे हे परवडत नसल्याने बसची सोय उत्तम आहे असे सांगितल जाते . आणि त्यामुळेच व्यापारी , तसेत महिला व कल्याण डोंबिवलीतच कामाला जाणारे नागरिक हे या केडीएमसीचा वापर करतात .

खोणी , शिरडोण ,लोढा या परिसरातीलच नव्हेतर स्टेशन रोड पासून लागणारे सागर्ली , सागांव , मानपाडा रोड , खिडकाळी या परिसरातील लोकांना या बस सेवेचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो . यामुळे कल्याण डोंबिवली महानगर पालिकेतर्फे देखील सध्या दिवसभर या बसेसची सेवा ही नागरिकांच्या हितासाठी सूरू आहे . मात्र काही कल्याण डोंबिवलीतील काही लहान भागातील बस सेवा ही अद्यापही सूरू झालेली नाही .

न्यूज अनकट प्रतिनिधी: राजश्री वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा