डोंबिवली एमआयडीसी भागात वारंवार होणाऱ्या स्फोटांमुळे प्रदूषणात वाढ ; नागरिक त्रस्त

डोंबिवली, २४ जानेवारी २०२३:साहित्यिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक नगरी अशी बिरुदावली लावलेल्या डोंबिवलीला प्रोबेस दुर्घटनेनंतर आता स्फोटांचे शहर म्हणूनही ओळखले जात आहे. शहरातील एमआयडीस भाग आणि त्यातील स्फोटांमुळे सातत्याने हादरणारी डोंबिवली हे चित्र गेल्या वर्षीपासून आहे.

डोंबिवलीच्या शहर आणि ग्रामीण पट्ट्यात नेहमीच्या प्रदूषणामुळे या भागातील रहिवाशांना निरनिराळ्या आजारांचा सामना करावा लागत आहे. अशा या डोंबिवली एमआयडीसीचे स्वतःचे वेगळे अग्निशमन केंद्र आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कार्यालय हवे, तसेच त्यांच्याकडे प्रशिक्षित अधिकारी व कर्मचारी हवेत, अशी मागणी रहिवाश्यांनी केली आहे.

डोंबिवली एमआयडीसी भागातील कारखान्यांची बंदी हरित लवादाद्धारे उठवण्यात आल्यानंतरही सुरक्षेच्या प्रश्नावर मौन कायम आहे. त्यामुळे कारखान्याच्या प्रश्नाबाबत आता तरी निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा सामान्यांनी व्यक्त केली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा