शिवसेना खासदार संजय राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

मुंबई, ५ सप्टेंबर २०२२ : पत्राचाळ प्रकरणात ईडीकडून अटक करण्यात आलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना २३ ऑगस्ट रोजी कोर्टाने ५ सप्टेंबर पर्यंत कोठडी दिली होती.आज या प्रकरणात PMLA कोर्टात सुनावणी झाली आणि त्यांना १९ सप्टेंबर पर्यंत कोठडी वाढवण्यात आली आहे.

मुंबईतील पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पात झालेल्या घोटाळा प्रकरणात राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत आणि यांचे निकटवर्तीय समजले जाणारे सुजीत पाटकर यांची या प्रकरणात ईडीनं चौकशी केली होती. या दरम्यान खासदार संजय राऊत यांना ईडीने ३१ जुलैला ताब्यात घेत अटक केली होती. त्यानंतर त्यांनी आपल्यावरील सर्व आरोप खोटे असून ही राजकीय चाल आहे. माझ्या विरोधात कट रचला असल्याचा आरोप केला होता.

काय आहे पत्राचाळ घोटाळा प्रकरण?

गोरेगाव येथील पत्राचाळीच्या पुनर्वसनासाठी प्रविण राऊत यांची गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनी ने राकेश वाधवान, सारंग वाधवान यांना सोबत घेऊन म्हाडासोबत कंत्राट घेतलं होतं. म्हाडा भाडेकरूंना घरे न बांधताच प्रविण राऊत यांच्या कंपनीने ९ विकास कामांना ९०१ कोटींना एफएसआय विकला आणि मेडोज नावाचा प्रोजेक्ट सुरू केला. त्यांच्या नावाखाली या कंपनीने १३८ कोटी रूपये जमा केले होते. त्यानंतर म्हाडाच्या इंजिनिअरने तक्रार केल्यानंतर या कंपनीची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती.

या चौकशीत १०३९७९ कोटी रूपयांचा गैरव्यवहार झाल्याचं उघड झालं. त्या मधील १०० कोटी रूपये प्रविण राऊत यांच्या अकाऊंटवर जमा करण्यात आले होते. ही रक्कम प्रविण राऊत यांच्या जवळच्या नातेवाईकांच्या खात्यावर ट्रान्सफर करण्यात आली होती. त्यातील ५५ लाख रूपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यावर जमा झाल्याचं उघड झालं. हे प्रकरण उघडकीस आलं म्हणून ईडीकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात आली.

न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा