राज्यात गेल्या २४ तासातील रुग्णवाढ…..

मुंबई, ८ ऑगस्ट २०२०: राज्यात गेल्या २४ तासात १०,४८३ नवीन रुग्ण आढळले तर ३०० जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. आज देखील १०,९०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची थोडी अधिक संख्या आज देखील पहायला मिळाली. तर राज्याचे रुग्ण बरे होणाचे प्रमाण ६६.७६ टक्के एवढे आहे. आतापर्यंत राज्यभरात ३,२७,२८१ रुग्ण बरे झाले आहेत. तर सध्या १,४५,५८२ ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

देशात बाधितांचा आकडा २० लाखांच्यापार!

देशातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रणाबाहेर गेला आहे. गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांची नोंद करण्यात आली, जी आजपर्यंत एकाच दिवसात कधी झाली नव्हती. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गुरुवारी सकाळी ८ वाजेपासून शुक्रवारी सकाळी ८ वाजेपर्यंत देशभरात कोरोनाची लागण झालेली ६२ हजार ५३८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, जे एका दिवसात करण्यात आलेली रेकॉर्ड ब्रेक नोंद आहे. त्यामुळे देशभरात कोरोना बाधितांची एकूण संख्या २० लाख २७ हजार ०७५ वर गेली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा