दिवाळी नंतर पुण्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ

पुणे, १९ नोव्हेंबर २०२० : पुणे शहरात दिवाळीपूर्वी कोविड रुग्णांची संख्या झपाट्याने कमी झाल्याचे चित्र समोर आलं. रोज नव्यानं आढळणा-या कोरोनाबाधितांची संख्या घटल्यानं महापालिकेला काही कोविड केअर सेंटर बंद करावी लागली तर अनेक खाजगी रुग्णालयांमध्येही इतर रुग्णांसाठी खाटा सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.

पुणे शहरात दिवाळीपूर्वी रोज सुमारे अडीच हजार चाचण्या होत होत्या. त्यात रोज सुमारे सव्वा दोनशे रुग्ण सापडत होते. दिवाळीमध्ये चाचण्यांचा वेळ कमी केल्यानं रोज सुमारे १००० चाचण्या होत होत्या आणि दीडशे रुग्ण सापडत होते. दिवाळीनंतर काल बुधवारी२७४३ चाचण्या करण्यात आल्या त्यात ३८४ रुग्ण सापडले आहेत.

पुण्यात मागील महिनाभर नवीन रुग्णांपेक्षा उपचार करून घरी सोडलेल्या रुग्णांची संख्या जास्त होती पण गेले दोन दिवस चित्र पालटलं आहे. या दोन दिवसात घरी सोडलेल्या रुग्णांपेक्षा नवीन रुग्ण जास्त आहेत. सणासुदीच्या काळात खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये नागरिकांनी केलेली गर्दी गाठीभेटी आणि सुरक्षित शारीरिक अंतर न पाळल्याने रुग्णसंख्या वाढल्याचे बोललं जातं.

त्याच बरोबर चाचण्यांची संख्या वाढताच नवबाधितांची संख्याही वाढण्यानं लाट ओसरत असल्याचा आभास चाचण्या घटल्यानं तर निर्माण झाला नाहीना अशी शंकाही येते. यापुढच्या काळात रुग्ण संख्या वााढत जाण्याची भीती आरोग्य विभागाने यापूर्वीच व्यक्त केली असून त्यादृष्टीने तयारीही सुरू केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा