प्रयोगशाळांनी नमुना तपासणीची क्षमता वाढवावी : नवल किशोर राम

पुणे दि.५ मे २०२० : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तपासणी करणाऱ्या सर्व खासगी आणि शासकीय प्रयोगशाळांनी कोविड-१९ ची नमुना तपासणीची क्षमता वाढवावी अशा सूचना, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज ( मंगळवारी) दिल्या आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राम यांच्या अध्यक्षतेखाली खासगी आणि शासकीय प्रयोगशाळांच्या डॉक्टरांसमवेत आढावा बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते.

यावेळी राम म्हणाले की, जिल्हयातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खासगी आणि शासकीय प्रयोगशाळांमध्ये कोविड-१९ चे सॅम्पल तपासणीसाठी येत असतात. त्या सॅम्पल तपासणीचा अहवाल वेळेत प्राप्त होण्यासाठी सर्वांनी प्रयोगशाळांची क्षमता वाढविण्यावर भर द्यावा. तसेच प्रयोगशाळांसाठी पुरेसे मनुष्यबळ, आवश्यक असणाऱ्या मशिनरी, इतर साहित्य कमी पडत असल्यास तातडीने जिल्हा प्रशासनाकडे याबाबतचे प्रस्ताव सादर करावेत.

प्रशासनाकडून आपल्याला आवश्यक त्या सोयी सुविधा पुरविण्यात येतील, असेही राम यांनी सांगितले.
या बैठकीवेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय देशमुख उपस्थित होते.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा