IND v AUS : तिसर्‍या कसोटीचे ठिकाण बदलले; ‘या’ मैदानावर होणार सामना

नवी दिल्ली, १३ फेब्रुवारी २०२३ :भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या चार सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना हा धरमशाला येथून हवलण्यात येणार असल्याचे वृत्त काही दिवसांपासून येत होते. अखेर यावर बीसीसीआयने आज शिक्कामोर्तब केले. याबाबत सोमवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने माहिती दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १ ते ५ मार्च या कालावधीत धर्मशाला येथे होणार सामना आता इंदौरच्या होळकर स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. धरमशाला स्टेडियमच्या नुतनिकरण्याचे काम अजून अपूर्ण असल्याने हा निर्णय घेण्यात आला. हा कसोटी सामना पुण्यात खेळवण्यात येईल अशी चर्चा देखील होती मात्र इंदौरने बाजी मारली.

दरम्यान, बॉर्डर गावस्कर ट्रॉफी अंतर्गत खेळल्या जाणाऱ्या चार सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ १ – ० ने पुढे आहे. नागपुरात खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने कांगारूंचा एक डाव आणि १३२ धावांनी पराभव केला.

  • भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी वेळापत्रक

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ४ सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना नागपुरात खेळला गेला. मालिकेतील दुसरा सामना १७ फेब्रुवारीपासून दिल्लीत, तर तिसरा कसोटी सामना १ मार्चपासून इंदौरमध्ये खेळवला जाणार आहे. चौथी आणि शेवटची कसोटी ९ मार्चपासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा