IND vs AUS : अष्टपैलू आर. अश्विनने नागपूर कसोटीत रचला इतिहास ; @ ४५०

नागपूर, ९ फेब्रुवारी २०२३ : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात पहिला कसोटी सामना सुरु असून सामन्याच्या पहिल्या डावात भारताने अप्रतिम गोलंदाजी केली आहे. बॉर्डर गावसकर ट्रॉफी अंतर्गत खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात अष्टपैलू रविचद्रन अश्विनने भारतासाठी एक मोठा विक्रम केला आहे. अश्विनने सामन्यातील वैयक्तिक पहिला आणि संघासाठी सहावी विकेट घेत इतिहास रचला आहे. त्याने ४५० कसोटी विकेट्स पूर्ण केले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अनिल कुंबळेला मागे टाकून तो सर्वात जलद ४५० कसोटी बळी घेणारा भारतीय ठरला आहे. तर जागतिक क्रिकेटमध्ये सर्वात जलदगतीनं विकेट पूर्ण करणाऱ्यांच्या यादीत अश्विन दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. त्याने ८९ कसोटी सामन्यात ही कामगिरी केली असून त्याच्या आधी केवळ श्रीलंकेचा दिग्गज मुरलीधरनने ८० सामन्यांत हा रेकॉर्ड केला आहे. याशिवाय अश्विन असा पहिला आशियाई खेळाडू आहे, ज्याने कसोटीत ३ हजार धावा आणि ४५० बळी घेतले आहेत.

  • १७७ धावांवर ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव आटोपला

दरम्यान, भारताने ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव दोन सत्रातच १७७ धावात संपवला. भारताकडून पुनरागमन करणाऱ्या रविंद्र जडेजाने ४७ धावात निम्मा संघ ( ५ विकेट्स) गारद केला. तर अश्विनने ३ विकेट्स घेत, त्याला चांगली साथ दिली. ऑस्ट्रेलियाकडून मार्नस लाबुशानेने सर्वाधिक ४९ धावा केल्या. तर मोहम्मद शमी – मोहम्मद सिराज या वेगवान जोडीने प्रत्येकी १ विकेट घेतली.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा