नगरसेवक परिषदेच्या पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदी इंदापूरच्या नगरसेविका राजश्री मखरे…..

इंदापूर, ११ डिसेंबर २०२०: नगरसेवक परिषद, मुंबई, महाराष्ट्र या राज्य पातळीवर काम करणाऱ्या संस्थेच्या पुणे जिल्हा महिला उपाध्यक्ष पदी इंदापूर नगरपालिकेच्या विद्यमान नगरसेविका तथा महिला विकास व बालकल्याण समिती सभापती राजश्री अशोक मखरे यांची निवड झाली आहे.

या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष . राम जगदाळे पाटील व राज्य सरचिटणीस मा. कैलास गोरे पाटिल, पुणे जिल्हा महिला अध्यक्षा अॅड. अरुणा डहाळे यांनी निवडीचे प्रमाणपत्र देवुन त्यांचे संघटनेत स्वागत केले. सदरची संस्था राज्य पातळीवरील सर्व नगरपालिका, नगरपंचायती, महानगरपालिका यातील सर्व पक्षीय नगरसेवक, नगरसेविका यांचे संघटन करून विविध मागण्या राज्य सरकारकडे करीत आहे.

राज्य पातळीवर संघटना मजबूत झाल्यास अनेक नगर विकासाच्या दृष्टीने निधी उपलब्ध करून घेऊन जनतेला दिलासा देता येईल. तसेच नगरसेवकांचे मानधन वाढवणे, नगरसेवकांना समान निधी मिळावा, नगरसेवकांना मंत्रालय प्रवेश त्यांच्या ओळखपत्रावरच देण्यात यावा, पेन्शन देण्यात यावी अशा विविध मागण्या शासनदरबारी मांडून पाठपुरावा करणार आहेत.

इंदापूर नगरपालिकेच्या धडाडीच्या, कार्यक्षम व निष्ठावंत नगरसेविका राजश्रीताई मखरे यांची पुणे जिल्हा महिला उपाध्यक्ष पदी निवड झाल्यामुळे शहरातील प्रलंबित विकास योजना व इतर अनेक नगरपालिकेच्या संदर्भातील कामांना बळकटी मिळणार आहे. मखरे यांचे निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा