रायगड मधील माणगाव तालुक्यातील इंदापूरमध्ये अवैध धंदे जोरात, पोलीस प्रशासनाची जाणीवपूर्वक डोळेझाक

माणगाव, रायगड २६ नोव्हेंबर २०२३ : रायगडच्या माणगांव तालुक्यातील इंदापूर शहराला सध्या अवैध धंद्याचे ग्रहण लागले आहे. इंदापूर मध्ये वाढवण- पाणसई रोडवर इंदापूर बस स्थानकाच्या मागे राजरोसपणे मटका, जुगार, चिमणी-पाखरू, चक्री असे धंदे सुरू आहेत. अश्या अवैध धंद्याकडे पोलीस प्रशासन जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचे येथील नागरिक सांगतात. जुगार मटका यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. या धंदेवाल्यांना पोलीस प्रशासनाची भिती आहे की नाही? असा उद्विग्न सवाल इंदापूर विभागातील सुजाण नागरिक उपस्थित करत आहेत.

सर्वसामान्य आणि मोलमजुरी करणारे बिगारी कामगार आपले नशीब आपले आजमावण्यासाठी या ठिकाणी मटका जुगार खेळतात. वेळप्रसंगी त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येते. या बाबतीत या धंदे वाल्याला विचारले असता त्यांच्या कडुन उत्तर असते, की आम्ही यांना काय घरी जाऊन बोलावतो का? तेच येतात आमच्याकडे मटका खेळायला. यामुळे या अवैध धंद्याना आळा बसलाच पाहिजे, असे मत इंदापूर (तळाशेत) मधील नागरीकांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले आहे.

गरिबांचे संसार उध्वस्त करणाऱ्या या अवैध धंद्यांवर रायगड पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली माणगाव उपविभागीय पोलीस अधिकारी आणि माणगाव पोलीस निरीक्षक यांनी त्वरित कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

न्युज अनकट प्रतिनीधी : प्रमोद जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा