इंदापूर, १२ सप्टेंबर २०२० : कोरोनामध्ये वार्तांकन करण्यासाठी आपल्या जीवावर उदार होऊन कर्तव्य बजावणाऱ्या पत्रकारांच्या वारसदार कुटुंबास तातडीने विमा कवच रक्कम द्यावी यासाठी इंदापूर पत्रकार संघाने नायब तहसीलदार शुभांगी अभंगराव यांना निवेदन दिले आहे .
यासंदर्भात नायब तहसिलदार शुभांगी अभंगराव यांना अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे पुणे जिल्हाध्यक्ष डॉ. संदेश शहा, शहराध्यक्ष सुरेश जकाते, वेब पोर्टल तालुकाध्यक्ष शैलेश काटे यांच्या हस्ते लेखी निवेदन देण्यात आले. यासंदर्भात पत्रकार, छायाचित्रकार काकासाहेब मांढरे म्हणाले, कोरोनावर मात करण्यासाठी
डॉक्टर्स, पोलीस, नर्सेस, महसूल विभाग यांच्या बरोबरीने पत्रकार देखील काम करतात .
सदर पत्रकारांना कोरोना वार्तांकन करताना कोरोनाची लागण झाल्यास तसेच त्यांचा दुर्दवी मृत्यू झाल्यास जिल्हाधिकारी यांनी शिफारस केल्यास मयत झालेल्या पत्रकाराच्या कुटुंबास ५० लाख रुपयांचे विमाकवच देण्यात येईल अशी घोषणा राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केली होती.
त्यानुसार शासनाने पत्रकार पांडुरंग रायकर व संतोष पवार यांच्या कुटुंबास विमा कवचाची रक्कम द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते हमीद अत्तार, पत्रकार धनंजय कळमकर, दीपक खिलारे, विजय शिंदे, शिवाजी पवार उपस्थित होते.
न्यूज अन कट प्रतिनिधी- निखिल कणसे.