इंदापूर : इंदापूर तालुक्यात वातावरणात गारवा निर्माण होऊ लागला आहे. थंडी चांगल्या प्रकारे पडू लागल्याने गव्हाचे पिकास या थंडीचा फायदा होऊन गव्हाच्या उत्पादनात मोठी वाढ होईल असे चित्र सध्या परिसरात दिसत आहे.
गव्हाचे पीक चांगले आले आहे. त्यावेळी थंडीचे प्रमाण कमी होते. परंतु गेल्या पाच-सहा दिवसांपासून वातावरणात गारवा निर्माण होऊन चांगल्या प्रकारे थंडी पडत असल्याने गव्हाचे पीक शेतामध्ये जोरदारपणे डोलताना दिसत आहे. शेतकऱ्यांच्या शेतामध्ये हे पीक चांगल्या प्रकारे आल्याने नक्कीच शेतकऱ्यांना या गव्हाच्या पिकापासून उत्पन्नही चांगले मिळणार आहे.
इतर पिकांमध्ये शेतकरी आर्थिक अडचणीत आला असला तरीदेखील गव्हाच्या पिकामध्ये मात्र चांगल्या प्रकारे चार पैसे शेतकऱ्यांना मिळतील ही आशा सध्या पडलेला थंडीमुळे जाणवत आहे.
या थंडीमुळे गव्हाच्या पिकामध्ये चांगली वाढ होऊन उत्पादन वाढणार असल्याने शेतकरी योग्यप्रकारे गव्हाच्या पिकाचे काळजी घेत आहे. त्यामुळे गव्हाच्या उत्पन्नातून शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या थोडा तरी दिलासा मिळणार आहे.