इंदापूर (प्रतिनिधी):इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे अवैध ऑनलाइन मटका तसेच वेश्याव्यवसाय वर बारामती क्राईम ब्रँच व भिगवण पोलीस स्टेशन यांची सयूंक्तपणे मोठी कारवाई..भिगवण शहरांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ऑनलाइन मटका तसेच वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेलवर अवैद्य वेश्या व्यवसाय चालू आहे अशा माहितीवरून बारामती क्राईम ब्रँच ने सदर ठिकाणी रेड केली १,६९,३२० रोख रक्कम व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, तसेच दोन पश्चिम बंगाल येथील 2 मुलींची वेश्याव्यवसाययातून सुटका करण्यात आली. वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्यास ताब्यात घेण्यात आले असून त्याचे विरुद्ध आणि मटका व ऑनलाइन बिंगो चालकांविरुद्ध भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.