इंदापूरकरांनी कोरोनाला यशस्वीपणे रोखले

इंदापूर (प्रतिनिधी- योगेश कणसे): संचारबंदी लागू होताच पुणे व मुबंई येथून इंदापूर तालुक्यात आलेल्या पाच हजारहून अधिक लोकांमुळे तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव होतो की काय याची चिंता होती. परंतु इंदापूरकरांनी या सर्वांना वेळीच क्वारंटाईन केल्यामुळे तसेच लॉकडाउनच्या नियमांचे कडक पालन केल्यामुळेच कोरोनाला रोखण्यात इंदापूर प्रशासनाला यश आले आहे.

यात इंदापूर पोलिसांनीही कठोर भूमिका घेत रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या व्यक्तींवर गुन्हे दाखल केले होते. शिवाय अशा लोकांना न्यायालयाने शिक्षाही केली. त्यामुळे शहर व तालुक्यात लॉक डाऊनची कड़क अंमलबजावणी होत आहे. ग्रामीण भागातही अनेक गावांनी आपले मुख्य रस्ते बंद ठेवलेले आहेत मात्र यातून अत्यावश्यक सेवेच्या वाहनांना सूट दिलेली आहे. एकूणच इंदापूरच्या ग्रामीण भागातही लॉक डाऊन चे काटेकोर पालन होताना दिसत आहे.

इंदापूर तालुक्यात सध्या एकही कोरोना बाधित रुग्ण नाही. तसेच कोणालाही कोरोनाची लक्षणे ही दिसत नाहीत. त्यामुळे इंदापूरकर अशीच साथ प्रशासनाला देत राहिले तर इंदापूर तालुक्यात यापुढेही कोरोनाचा शिरकाव होणार नाही असे स्थानिक प्रशासनाचे मत आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा