इंदापूर, दि. १६ जून २०२० : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने मंगळवारी प्रविण माने युवामंच आणि शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून निमगाव केतकी येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.
माजी बांधकाम व आरोग्य समिती सभापती आणि पुण्याचे विद्यमान सदस्य प्रविण माने यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
निमगाव केतकी येथे आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचे प्रविण माने यांच्या हस्ते उदघाटन पार पडले. या शिबिरात रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास २० लिटर पाण्याचे जार, सॅनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले. राज्याला गरज असताना या रक्तदान शिबिरात आपले अमुल्य योगदान देत इंदापूरकरांनी राज्याची रक्तपेढी सशक्त करण्याचा वसा पेलला असल्याचे गौरवोद्गार यावेळी प्रविण माने यांनी काढले.
याप्रसंगी तात्यासाहेब वडापुरे, समीर मोरे, कांतीलाल भोंग, मा. सभापती दत्तू शेंडे, बाबजी भोंग, प्रविण डोंगरे, अमित जाधव, अमोल जाधव आणि राजू राऊत मान्यवर उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे