पुणे, १६ ऑगस्ट २०२०: काल स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते . देशाला स्वातंत्र्य मिळून या वर्षी ७४ वे वर्ष आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन आहे. यामुळे पहिल्यांदाच ध्वजारोहण हे विद्यार्थ्यांशिवाय तसेच संबंधित मोजक्या अधिकाऱ्यांच्याच उपस्थित करण्यात आले. दरवर्षी करण्यात येणारे उपक्रम या वर्षी मात्र नाही करता आले. मात्र, सद्यस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन काळजीपूर्वक वंदे मातरम् संघटना आणि रेडिओ सिटी ९१.१ यांनी बुधवार पेठ येथील मुलांसोबत स्वातंत्र्यदिन साजरा केला.
पुण्यातील बुधवार पेठ येथील रेड लाईट भागातील राहणाऱ्या देवदासी भगिनी यांच्या लहान मुलांना चित्रकला वही, तसेच त्यासाठी लागणारे साहित्य आणि फळ वंदे मातरम् संघटना आणि रेडिओ सिटी ९१.१ यांच्या संयुक्त विद्यमानाने आज वाटप करण्यात आले.
या अभिनव उपक्रमाचे आयोजन वंदे मातरम् संघटना प्रदेशाध्यक्ष वैभव वाघ आणि प्रदेश कार्याध्यक्ष सचिन जामगे यांच्या नेतृत्वाखाली वंदेमातरम् संघटना पुणे शहर अध्यक्ष प्रशांत नरवडे, पुणे शहर उपाध्यक्ष आकाश गजमल यांनी केले. तसेच, रेट लाईट एरिया मधील समाजसेविका अलका ताई भुजनाळ यांच्या मदतीने हा उपक्रम साधला गेला. या प्रसंगी रेडिओ जॉकी शो शोनाली आणि त्यांची टीम ही उपस्थित होती. तसेच इतर काही कार्यकर्ते देखील तिथे उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी- प्रगती कराड