आंबेगाव : घरातील सर्वच थोडेफार शिकलेले पण, काहीतरी वेगळे करण्याची धडपड स्वस्थ बसू देत नव्हती. शेतात काम करताना फावल्या वेळेत त्याने इंधन व विजेची बचत अनोखे इंजिन कसे बनविता येईल, हि शक्कल लढविली. दुचाकी चारचाकीमध्ये या इंजिनचा वापर करता येऊ शकतो. हे त्याने कमी कालावधीत सिद्धही केले आहे. आपल्या मित्र परिवाराच्या सल्ल्याने त्याने शोध लावलेल्या इंजिनचे पेटंटही मिळविले.
आंबेगाव तालुक्यातील मांदळेवाडी येथील अक्षय धनंजय आदक शिक्षण बारावी, सध्या अक्षय भोसरी येथे टेल्को रस्ता परिसरात राहात आहे. इंजिन बनविण्यासाठी काही जवळचे नातेवाईक व मित्रांनी त्याला मदत केली. त्याच्या पेटंटचे नाव ” इम्प्रूव्ह परपेच्युअल मशिन इलेक्ट्रिसिटी जनरेशन ” असे आहे. जून २०१९ मध्ये त्याला हे पेटंट मिळाले आहे. अॅटोमोबाईल क्षेत्रातील व्यवसायाला या इंजिनमूळे मोठा फायदा होणार आहे. इंधनाचे वाढते दर, आरोग्य व कचऱ्याच्या समस्या वायुप्रदूषण यावर मात करणारा हा घटक आहे.
इंजिन मध्ये चोवीस तास बॅटरी, कंट्रोलर, ड्रिमर, इनव्हर्टर, एसी मोटार, अलर्टनेटर, टायमार, स्विच, चैन, ट्रान्सफॉर्मरचा वापर केलेला आहे. यामुळे पर्यावरणास कोणतीही हानी होणार नाही. शुन्य प्रदूषण अशी या इंजिनची संकल्पना आहे. यासाठी कोणत्याही चार्जिग पध्दतीचा अवलंब केला नाही. इंजिनमध्ये काही बिघाड झाल्यास खर्चिक नसून ते त्वरीत दुरुस्त करता येते. या इंजिनचे फायदे-इको फ्रेंडली इंजिन, चार्जिग करावे लागत नाही. वेळेची बचत, विजेची बचत, किलोमटरची मर्यादा नाही, बॅटरी किंवा देखभाल व दुरुस्ती खर्चिक नाही,अपारंपरिक ऊर्जेचा वापर.
एक लाख रुपये आला खर्च…
हे इंजिन बनविण्यासाठी जवळ -जवळ एक लाख रुपये खर्च आला. हे इंजिन तयार करताना खूप मेहनत घेतली आहे. सध्या शासनस्थरावर काय मदत मिळते का हे पाहात आहे. कसेही करून मला हे इंजिन बाजारात आणावयाचे आहे. मग मला कितीही कष्ट करावे लागले तरी चालतील.
-अक्षय आदक-संशोधक
अक्षयने लावलेला शोध खरोखर फार मोठा आहे.मूलगा म्हणून मला त्याचा फार मोठा अभिमान आहे. त्याला शासनाने मदत करावी हिच अपेक्षा.
– धनंजय आदक, वडील