पुणे, ६ फेब्रुवारी २०२३ : पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी कर्नाटकात पोचले. जिथे त्यांनी बंगळुरू येथील इंडिया एनर्जी वीक २०२३ कार्यक्रमात इंडियन ऑईलने विकसित केलेल्या सोलर कुकिंग सिस्टीमच्या ट्विन-कूकटॉप मॉडेलचे अनावरण केले. कार्यक्रमात पंतप्रधान मोदी म्हणाले, की अक्षय ऊर्जा, हायड्रोजन आणि अमोनियासह ऊर्जेच्या नवीन अवतारांच्या निर्मितीसाठी पुढील पाच वर्षे देशासाठी खूप महत्त्वाची असणार आहेत. पंतप्रधान म्हणाले, की महामारी आणि युद्ध असूनही, भारत एक जागतिक उज्ज्वल स्थान आहे.
देशात नंबर-१ इलेक्ट्रॉनिक्स वाहन तयार करण्याचे आमचे लक्ष्य आहे आणि आमच्याकडे इलेक्ट्रॉनिक्स वाहन धोरण देखील आहे जे गुंतवणूकदारांना अनुकूल आहे. २१व्या शतकातील जगाचे भविष्य ठरविण्यात ऊर्जा क्षेत्राची मोठी भूमिका आहे. विकसित होण्याचा संकल्प घेणाऱ्या भारतातील ऊर्जा क्षेत्रासाठी अभूतपूर्व शक्यता निर्माण होत आहे.
नरेंद्र मोदी म्हणाले, की येत्या चार-पाच वर्षांत भारतातील गॅस पाइपलाइन नेटवर्क सध्याच्या २२,००० किमीवरून ३५,००० किमीपर्यंत पोचेल. भारताची जगातील चौथ्या क्रमांकाची कच्च्या तेलाची शुद्धीकरण क्षमता आहे. करोडो लोक गरिबीतून बाहेर आले आणि मध्यमवर्गीय वर्गात आले. पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिसळण्याच्या लक्ष्याकडे भारत वाटचाल करीत आहेत.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड