आज ‘हायवोल्टेज’ लढतीसाठी भारत आणि दक्षिण आफ्रिका सज्ज

3

पुणे, ११ ऑक्टोबर २०२२: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्या मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आज नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर दुपारी दीड वाजता खेळवला जाणार आहे. दरम्यान हवामान खात्याकडून आज पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, सध्या पावसामुळे दिल्लीत परिस्थिती खराब आहे. गेल्या काही दिवसापासून दिल्लीत सतत पाऊस पडत आहे. त्यामुळेच आजच्या तिसऱ्या वनडे सामन्यावर पावसाचा धोका निर्माण झाला आहे.

दरम्यान आजचा सामना जिंकणारा संघ मालिकाही जिंकणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी आजचा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे, या मालिकेतील पहिला सामना आफ्रिकेने जिंकला होता. तर दुसऱ्या सामन्यात भारताने शानदार पुनरागमन करत आफ्रिकेचा पराभव केला होता. यामुळे या मालिकेत दोन्ही संघ १-१ ने बरोबरीत आहेत.

दरम्यान टीम इंडियाने मागील एक वर्षापासून सात एक दिवसीय मालिका खेळल्या असून त्यातील एकच मालिका गमावली आहे आणि ती मालिका दक्षिण आफ्रिका विरुद्धच गमावलेली आहे. आज मालिकेतील तिसरा आणि अखेरचा एकदिवसीय सामना दिल्लीच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. जर आज भारतीय संघ पराभूत झाल्यास दक्षिण आफ्रिके विरुद्ध घरच्या मैदानावर सलग दुसरी मालिका गमावेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा