ऑस्ट्रेलिया, ६ डिसेंबर २०२०: भारत ऑस्ट्रेलिया मधे खेळला गेलेल्या दुसरा टी २० सामना भारताने ६ गडी राखून जिंकला आहे. तसेच ३ सामान्यांची आसणारी ही टी २० मालिका भारताने २ – ० ने आपल्या खिशात घातली आहे. प्रथम फलंदाजी करत आसताना ऑस्ट्रेलियांने १९५ धावांचे आव्हान समोर ठेवले होते.
१९५ धावांचा पाठलाग करताना भारताने केवळ चार गडी गमावले, पण सुरवात चांगली मिळाली. तसेच आज शिखर धवन देखील फाॅर्म मधे आल्याचे दिसून आले. भारताकडून धवनने ५२ धावा, विराट ने ४० तर हार्दिक पांड्या ने नाबाद ४२ धवांची पारी खेळून भारताला विजय मिळवून दिला.
भारताने मोडला पाकिस्तानचा रेकॉर्ड…..
भारतीय संघला टी-२० च्या इतिहासात पाकिस्तानचा मोठा विक्रम तोडण्याची संधी होती. पाकिस्तानने सलग ९ सामने जिंकण्याचा विक्रम केला होता.तर भारताने पहिली टी-२० जिंकून पाकिस्तानच्या विक्रमीशी बरोबरी केली होती.आणि भारताने त्या पाठोपाठ दुसरी टी-२० मॅच जिंकून सलग एका पाठोपाठ एक म्हणजेच लागोपाठ दहा टी-२० सामने जिंकण्याचा विक्रम केला.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव