मुंबई, १४ मे २०२१: देशाचे राष्ट्रीय नियामक, भारतीय औषध महानियंत्रक (डीसीजीआय) यांनी काळजीपूर्वक तपासणी केल्यानंतर, विषय तज्ञ समिती (एसईसी) ची शिफारस मान्य केली आहे आणि १२ मे रोजी लस उत्पादक भारत बायोटेक लिमिटेडला २ ते १८ वर्षे वयोगटासाठी कोवॅक्सीन (कोविड प्रतिबंधक लस ) ची दुसऱ्या/ तिसऱ्या टप्यातील मानवी चाचणी घेण्यासाठी परवानगी दिली.
मेसर्स भारत बायोटेक इंटरनेशनल लिमिटेड, हैदराबाद (बीबीआयएल) ने २ ते १८ वर्षे वयोगटासाठी कोवॅक्सीन ची दुसऱ्या/ तिसऱ्या टप्यातील मानवी चाचणी घेण्याचा प्रस्ताव दिला होता. ५२५ निरोगी स्वयंसेवकांवर ही चाचणी घेण्यात येईल. या चाचणीत , ० दिवस आणि २८ दिवस दरम्यान अंतस्नायुमधून लसीच्या दोन मात्रा दिल्या जातील.
जलद नियामक प्रतिसाद म्हणून, हा प्रस्ताव विषय तज्ज्ञ समिती (एसईसी) (कोविड -१९) कडून ११ मे. रोजी विचारात घेण्यात आला. समितीनं तपशीलवार विचारविनिमयानंतर प्रस्तावित टप्पा दोन / तीन च्या मानवी चाचणीला सशर्त परवानगी देण्याची शिफारस केली.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे