भारतात सेक्स टॉइजची भरभरून खरेदी, ६५ % वाढ

नवी दिल्ली, दि. २३ जुलै २०२०: भारतातील आपल्या समाजात सेक्स या विषयावर खुलेपणानें बोलले जात नाही पण लॉकडाऊनच्या या काळात मात्र भारतीयांनी सेक्स टॉइजची मोठ्या प्रमाणात खरेदी केली आहे.या मधे तब्ब्ल ६५ टक्के वाढ झाली असून याबाबतची आकडेवारी ‘इंडिया अनकव्हर्ड: इन साइटफुल एनॅलिसिस ऑफ सेक्स प्रोडक्ट्स ट्रेंड्स इन इंडिया’ या रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे.

दिल्ली एनसीआरच्या तुलनेत मुंबई महानगर प्रदेशात सेक्स प्रोडक्टची २४ टक्के जास्त विक्री झाली आगे .सेक्स प्रोडक्टच्या खरेदीमध्ये पुणेही पहिल्या ८ शहरांमध्ये आहे. सूरत शहरात प्रति ऑर्डरमागे ३,९०० रुपये खर्च केले जातात.सेक्स टॉइज खरेदी करणाऱ्यांमध्ये २५ ते ३४ वयोगटातला ग्राहकवर्ग जास्त असून महिला दुपारी १२ ते ३ तर पुरुष रात्री ९ ते मध्यरात्रीपर्यंतच्या वेळेत खरेदी करतात असे देखील रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलंय. विजयवाडा, जमशेदपूर, बेळगाव आणि वडोदरा या शहरात पुरुषांपेक्षा महिला जास्त खरेदी करतात.

याबाबतचे विश्लेषण डोळे विस्फारणारे आहे.भारतीय बाजारात कुठल्या सेक्स टाॅईजला मागणी आहे? खरेदी करण्या-या ग्राहकांचा कल काय? सेक्स टॉईजची विक्री करणाऱ्या संकेतस्थळावर लॉक डाऊनच्या काळात तब्ब्ल २.२ कोटी भारतीयांनी व्हिजिट केलं असून ३ लाख ३५ हजार उत्पादनांची ऑनलाइन विक्री सुद्धा झाली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा