पाकिस्तान 2025 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद भूषवणार आहे. टीम इंडिया पाकिस्तानला जाणार की नाही यावर भारताचे क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. अनुराग ठाकूर बुधवारी म्हणाले, ‘वेळ आल्यावर काय करायचे ते पाहू. यामध्ये गृह मंत्रालयाचा समावेश असेल. जेव्हा आंतरराष्ट्रीय स्पर्धा असतात तेव्हा बरेच काही पाहावे लागते.
ते म्हणाले की, अलीकडच्या काही दिवसांत तेथील परिस्थिती चांगली नसल्यामुळे अनेक देशांनी पाकिस्तान दौऱ्यातून माघार घेतली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानातील परिस्थिती अत्यंत बिकट असून ती चिंताजनक आहे. आम्ही परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय घेऊ.
29 वर्षांनंतर पाकला मोठी संधी मिळाली
जवळपास 29 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर आयसीसीची स्पर्धा पाकिस्तानमध्ये खेळवली जाणार आहे. शेवटच्या वेळी 1996 च्या एकदिवसीय विश्वचषकाचे काही सामने पाकिस्तानमध्ये खेळले गेले होते. यानंतर पाकिस्तानमध्ये आयसीसीचा कोणताही कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला नाही.
• 2024 T20 विश्वचषक: यूएसए आणि वेस्ट इंडिज
• 2025 चॅम्पियन्स ट्रॉफी: पाकिस्तान
• 2026 T20 विश्वचषक: भारत आणि श्रीलंका
• 2027 एकदिवसीय विश्वचषक: दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया
• 2028 T20 विश्वचषक: ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड
• 2029 चॅम्पियन्स ट्रॉफी: भारत 2030 T20 विश्वचषक: इंग्लंड, आयर्लंड आणि स्कॉटलंड
• 2031 एकदिवसीय विश्वचषक: भारत आणि बांगलादेश
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे