दिल्लीत भारत-मध्य आशिया बैठक सुरू : एनएसए डोवाल यांनी उचलला दहशतवादाचा मुद्दा; म्हणाले…

दिल्ली, ६ डिसेंबर २०२२ :राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, सुरक्षा परिषदांच्या सचिवांची पहिली भारत-मध्य आशिया बैठक राजधानी दिल्लीत सुरू झाली आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांनी हे बैठकीच्या अध्यक्षस्थानी असून त्यांनी या बैठकीत सर्वांचे स्वागत केले. या परिषदेत उझबेकिस्तान, कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तानचे उच्चपदस्थ अधिकारी सहभागी झाले आहेत.

यावेळी अजित डोवाल यांनी अफगाणिस्तानमध्ये निर्माण होणाऱ्या दहशतवादाच्या धोक्याबाबत चर्चा केली. ते म्हणाले की, मध्य आशियाई देशांसोबत बैठकीला भारताचे प्राधान्य आहे. आम्ही या क्षेत्रात गुंतवणुकीपासून कनेक्टिव्हिटीपर्यंत सर्व प्रकारे सहकार्य करण्यास तयार आहोत.

  • दहशतवादी नेटवर्कचे अस्तित्व हा चिंतेचा विषय

अजित डोवाल पुढे म्हणाले, अफगाणिस्तानसह या प्रदेशात दहशतवादी नेटवर्कचे अस्तित्व हा देखील चिंतेचा विषय आहे. वित्तपुरवठा हे दहशतवादाचे जीवन रक्त आहे आणि दहशतवादाच्या वित्तपुरवठ्याचा सामना करणे हे आपल्या सर्वांसाठी प्राधान्य असले पाहिजे.

  • अफगाणिस्तान हा आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचा मुद्दा

पुढे ते म्हणाले, संयुक्त राष्ट्रांच्या सर्व सदस्यांनी दहशतवादी कारवायांमध्ये गुंतलेल्या घटकांना मदत करण्यापासून परावृत्त केले पाहिजे. तर अफगाणिस्तान हा आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचा मुद्दा आहे, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – सुरज गायकवाड.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा