आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेला मदत करण्यासाठी पुढं आला भारत, एस. जयशंकर यांनी केले अनेक करार

नवी दिल्ली, 16 जानेवारी 2022: भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी शनिवारी श्रीलंकेचे अर्थमंत्री बासिल राजपक्षे यांच्याशी चर्चा केली आणि अनेक करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. तपशीलवार आभासी बैठकीदरम्यान, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनीही श्रीलंकेच्या ताब्यात असलेल्या भारतीय मच्छिमारांचा मुद्दा उपस्थित केला आणि मानवतावादी मदतीचा इशारा म्हणून त्यांची लवकर सुटका करण्याचं आवाहन केलं. जयशंकर यांनी बैठकीनंतर ट्विट केलं की, आम्ही श्रीलंकेच्या अर्थमंत्र्यांसोबत सविस्तर आभासी बैठक पूर्ण केलीय. या बैठकीत ते म्हणाले की, भारत हा श्रीलंकेचा खंबीर आणि विश्वासार्ह भागीदार असेल. परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी पुढं आश्वासन दिलं की भारत या गंभीर प्रसंगी श्रीलंकेला पाठिंबा देण्यासाठी इतर आंतरराष्ट्रीय भागीदारांसह पुढाकार घेईल. त्रिंकोमाली टँक फार्मच्या प्रगतीचे परराष्ट्र मंत्र्यांनी कौतुक केलं.

दोन्ही देशांमधील महत्त्वाचे करार

बैठकीदरम्यान, 2965 कोटींचे चलन स्वॅप आणि 3705 कोटींचे पेमेंट पुढं ढकलण्याबाबत करार झाला. याशिवाय जीवनावश्यक वस्तूंसाठी 7400 कोटी रुपयांच्या मुदत कर्ज सुविधा आणि इंधन खरेदीसाठी 3700 कोटी रुपयांच्या कर्ज सुविधेवर चर्चा करण्यात आली.

श्रीलंकेचे अर्थमंत्री बासिल राजपक्षे यांनी भारताकडं मागितली होती मदत

मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत असलेले श्रीलंकेचे अर्थमंत्री बासिल राजपक्षे यांनी डिसेंबर 2021 मध्ये नवी दिल्लीला भेट देऊन आर्थिक संकटाशी झुंजत असलेल्या श्रीलंकेला मदत करण्याचं आवाहन केलं होतें

श्रीलंकेत आर्थिक संकट, भारताकडून कर्जाची मागणी

श्रीलंकेत जवळपास सर्वच जीवनावश्यक वस्तूंचं संकट आहे. अशा परिस्थितीत या बेट राष्ट्राने भारताकडून जीवनावश्यक वस्तूंच्या आयातीसाठी एक अब्ज डॉलर्सचं कर्ज मागितलं आहे. श्रीलंकेच्या मध्यवर्ती बँकेचे गव्हर्नर अजित निवार्ड काब्राल म्हणाले की, श्रीलंका त्याच्या कर्जाच्या पेमेंटची पुनर्रचना करण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून चीनकडून आणखी एका कर्जासाठी वाटाघाटी करत आहे. मात्र, कर्जाची रक्कम निश्चित व्हायची आहे.

दोन्ही देशांमधील व्यापाराला चालना मिळंल: बँक ऑफ श्रीलंका

श्रीलंकन ​​बँकेचे गव्हर्नर म्हणाले की, वस्तू आयात करण्यासाठी श्रीलंका भारताशी एक अब्ज डॉलर्सच्या कर्जासाठी बोलणी करत आहे. यामुळं श्रीलंकेला कर्ज फेडण्यास मदत होईल आणि दोन्ही देशांमधील व्यापार वाढेल. आयात पेमेंटसाठी डॉलरच्या संकटामुळं श्रीलंकेला सध्या सर्व जीवनावश्यक वस्तूंच्या तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. श्रीलंकेच्या सरकारी अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की भारताकडून 1 अब्ज डॉलर्स कर्ज हे अन्न आयातीपुरतं मर्यादित असंल. याच शेतकऱ्यांनी येत्या दोन महिन्यांत देशात अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होण्याचा इशारा दिलाय.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा