नवी दिल्ली, ११ एप्रिल २०२१: नागरिकांना लसीच्या १० कोटी मात्रा देत कोविड-१९ विषाणूला रोखण्याच्या कामी भारताने अजून एक मैलाचा दगड गाठला आहे. आज रात्री 8 वाजेपर्यंतच्या तात्पुरत्या अहवालानुसार आजपर्यंत देशभरात लसीच्या एकूण १०, १२, ८४, २८२ मात्रा देण्यात आल्या आहेत.
लसीकरणाची व्याप्ती ४५ वर्षे त्यापुढील वयाच्या लोकांसाठी वाढवत त्याशिवाय या वयोगटासाठी सरकारी व खासगी कामाच्या जागी लसीकरणाची सोय करुन देण्यास मुभा असे अनेक महत्वाचे निर्णय, सहयोग व समन्वयाच्या भूमिकेतून केंद्र व राज्यांनी कोविडच्या विळख्यातून मोलाचे जीव वाचावेत म्हणून घेतले. परिणामकारक औषधोपचार व्यवस्थापनामुळे भारताचा मृत्यूदर जगात सर्वात कमी म्हणजे १.२८% राहिला.
ही बाब “सकल समाज” या भूमिकेची साक्ष देणारी आहे. अफवा आणि एखाद्याच्या फायद्याच्या हेतूने केलेली दिशाभूल याला बळी न पडता लोकांनी लसीबाबतची उदासिनता सोडून कोविड-१९च्या उच्चाटनासाठी व्यवस्थापनाला मदतीचा हात दिला. कोविड-१९ मुळे देशातील जोखीम असलेल्या अनेक गटांना संरक्षण देणारी व्यवस्था मिळाली तसेच या गटांचे उच्च् स्तरावरून वारंवार पुनरावलोकन व परीक्षण केले जाईल.
एकूण १० कोटी मात्रांचे व्यवस्थापन वेगाने व्यवस्थापन करणारा भारत हा जगातील सर्वात वेगवान देश आहे. १०० दशलक्ष मात्रा देण्यासाठी अमेरिकेने ८९ दिवस तर चीनने १०३ दिवस घेतले.
८५ दिवसात मिळवलेल्या या यशाची इतर देशांशी तुलना करताना भारताचा प्रतिदिन लसीकरणाचा वेग सर्वाधिक आहे हे महत्वाचे. अमेरिकेने ८५ दिवसांमध्ये ९२.०९ दशलक्ष मात्रा तर चीनने ८५ दिवसात ६१.४२ दशलक्ष मात्रा दिल्या.
एकूण १५,१७,२६० सत्रात देण्यात आलेल्या १०.१२ कोटी मात्रांमध्ये लसीची पहिली मात्रा घेणाऱ्या ९०,०३,०६० आरोग्यकर्मचाऱ्यांचा आणि लसीची दुसरी मात्रा घेणाऱ्या ५५,०६,७१७ आरोग्य कर्मचाऱ्यांचा तसेच लसीची पहिली मात्रा घेणाऱ्या आघाडीवर काम करणाऱ्या ९९,३९,३२१ कर्मचाऱ्यांचा, लसीची दुसरी मात्रा घेणाऱ्या आघाडीवर काम करणाऱ्या ४७,२८,९६६ कर्मचाऱ्यांचा, लसीची पहिली मात्रा घेणाऱ्या ४५ ते 59वर्षे वयोगटातील ३,०१,१४,९५७ लाभार्थ्यांचा आणि दुसरी मात्रा घेणाऱ्या ४५ ते ५९ वर्षे वयोगटातील ६,३७,७६८ लाभार्थ्यांचा तसेच पहिली मात्रा घेणाऱ्या ६० वर्षावरील वयोगटातील ३,९५,६४,७४१ लाभार्थ्यांचा, दुसरी मात्रा घेणाऱ्या ६० वर्षावरील वयोगटातील १७,८८,७५२ लाभार्थ्यांचा समावेश आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे