भारताने केला ३.५ कोटींपेक्षा जास्त चाचण्या करण्याचा टप्पा पार…

नवी दिल्ली, २३ ऑगस्ट २०२०: पुण्यामध्ये असलेल्या एकमेव प्रयोगशाळेत जानेवारी २०२० मध्ये एका चाचणीपासून सुरुवात करत, भारताने आजतागायत ३.५ कोटीहून जास्त चाचण्यांचा टप्पा ओलांडला आहे. गेले सहा दिवस सातत्याने आठ लाखांपेक्षा जास्त चाचण्या केल्या जात आहेत, गेल्या २४ तासात ८,०१,१४७ कोविड-१९ चाचण्या करण्यात आल्या असून चाचण्यांची एकूण संख्या ३,५२,९२,२२० झाली आहे.

केंद्राने घेतलेल्या लक्ष्य केंद्रित आणि स्तरबद्ध दृष्टीकोनामुळे झपाट्याने जास्तीत जास्त चाचण्या करण्याचे धोरण अंमलात आणले जात आहे आणि त्यामुळे चाचण्यांच्या संख्येत खूप मोठी वाढ दिसत आहे.

गेल्या तीन आठवड्यात दैनंदिन चाचण्यांच्या सरासरीत वाढ झाल्याने देशभरात कोविड-१९ च्या चाचण्यांच्या स्थितीत प्रगती झाल्याचे चित्र दिसून येत आहे. एकीकडे चाचण्यांच्या संख्येत वाढ होत आहे तर दुसरीकडे सक्रिय रुग्णांच्या दैनंदिन सरासरीत घट होऊ लागली आहे.

चाचण्यांविषयीच्या धोरणामुळे देशभरातील प्रयोगशाळांचे जाळे देखील विस्तारण्यास मदत झाली आहे. आज देशभरात ९८३ सरकारी आणि ५३२ खाजगी प्रयोगशाळा आहेत. या १५१५ प्रयोगशाळा लोकांना समावेशक चाचण्यांच्या सुविधा उपलब्ध करून देत आहेत.

यामध्ये:

• रियल टाईम आरटी पीसीआर आधारित प्रयोगशाळा: ७८० ( सरकारी: ४५८ + खाजगी: ३२२)

• ट्रूनेट आधारित चाचणी प्रयोगशाळा: ६१७ ( सरकारी: ४९१ + खाजगी: १२६)

• सीबीएनएएटी आधारित चाचणी प्रयोगशाळा: ११८ (सरकारी: ३४ + खाजगी: ८४)

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा