नवी दिल्ली, ३ सप्टेंबर २०२०: शंभरहून अधिक मोबाइल अॅप्सवर भारताने बंदी घातल्यानंतर चीनचे हे विधान समोर आले आहे. चीनकडून असे म्हटले जात आहे की, ही चिंतेची बाब आहे आणि यामुळे चिनी उद्योजकांच्या हिताचे नुकसान झाले आहे. आदल्या दिवशी सुरक्षेचा हवाला देत भारताने पब्जीसह ११८ मोबाइल अॅप्सवर बंदी घातली होती.
न्यूज एजन्सी रॉयटर्सने चीनच्या वाणिज्य मंत्रालयाच्या हवाल्याने सांगितले की, मोबाइल अॅप्सवर भारताने बंदी घातली आहे. यामुळे चिनी गुंतवणूकदार आणि सेवा पुरवणाऱ्याच्या हिताचे नुकसान झाले आहे. चीन या विषयावर गंभीर आहे आणि त्याला तीव्र विरोध आहे.
महत्त्वाचे म्हणजे यापूर्वी अशी दुसरी वेळ आहे जेव्हा भारताने चिनी अॅप्सवर बंदी घातली आहे. तेही जेव्हा दोन्ही देशांमधील सीमेवर तणाव आहे. यापूर्वी गलवान व्हॅलीतील तणावानंतर भारताने टिकटॉकसह ५९अॅप्सवर बंदी घातली होती आणि आता पब्जीसह ११८ अॅप्सवर बंदी घातली आहे.
इतकेच नव्हे तर सिक्युरिटीचे कारण देत अनेक चीनी कंपन्यांच्या भारताने गेल्या काही काळात निविदा रद्द केल्या आहेत. काही भागात चिनी कंपन्यांच्या प्रवेशावरही बंदी घालण्यात आली आहे. अमेरिकेनेही भारताने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले आहे. अमेरिकेचे म्हणणे आहे की, सुरक्षेच्या बाबतीत भारताचा निर्णय अगदी बरोबर आहे. आधीच्या निर्णयावर अमेरिकेनेही भारताला पाठिंबा दर्शविला होता.
वास्तविक, चीनची सर्वात मोठी समस्या अशी आहे की ज्या अॅप्सवर बंदी घातली गेली आहे त्यातील बहुतेक वापरकर्ते भारतात आहेत. यासह इतर अनेक देश देखील या बंदी नंतर याचा विचार करीत आहेत, कारण या निर्णयामुळे त्यांच्यासाठी कृतीचा मार्ग मोकळा झाला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी