आय एन एस ध्रुव नौदलाच्या स्वाधीन, अशी युद्धनौका बनवणारा भारत चौथा देश

नवी दिल्ली, १८ मार्च २०२१: गेल्या काही वर्षांपासून भारत एका सिक्रेट मोहिमेवर काम करत होता. याबाबत २०१७ पासून माध्यमामध्ये अनेक चर्चा देखील सुरू होत्या. असे सांगितले जात होते की, २०१८ पर्यंत भारतीय नौदलात एक असे जहाज तैनात केले जाईल जे मिसाइल्स आणि सॅटेलाईट ला ट्रेक करू शकेल. परंतु, गेल्या दोन वर्षात याविषयी कोणतीही बातमी समोर आली नव्हती. मात्र, आता हे जहाज नौदलात तैनात करण्यात आले आहे अशी बातमी समोर आली आहे. आय एन एस ध्रुव असे या युद्धनौकेचे नाव आहे. दुसऱ्या शब्दात त्याला सिक्रेट मिसाईल ट्रॅकिंग वॉर शिप असेदेखील म्हटले जाते.

या जहाजाचे वजन १५ हजार टन एवढे आहे जे अनेक छोट्या देशांमधील युद्धनौका किंवा हेलिकॉप्टर पेक्षाही जास्त आहे. हे जहाज हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड कंपनीने बनवले आहे. त्यावेळी या जहाजाचे नाव व्हीसी 11184 असे ठेवण्यात आले होते.

या मिसाईल ट्रॅकिंग वॉर शिप वर अनेक अत्याधुनिक तंत्रज्ञान बसवण्यात आले आहेत. याच्या साह्याने ही वॉर शिप कोणत्याही प्रकारची मिसाईल ट्रॅक करू शकते. जसे की जर चीनने भारताच्या दिशेने एखादी न्यूक्लियर मिसाईल लॉन्च केली तर प्रथम आय एन एस ध्रुव या मिसाईल ला डिटेक्ट करेल. यानंतर याची माहिती नौदलाला पाठवेल. नौदलाला येत असलेल्या न्यूक्लियर मिसाइल ची माहिती मिळतात भारताने नुकतेच रशियाकडून विकत घेतलेले मिसाइल डिफेन्स सिस्टम एस 400 न्यूक्लिअर मिसाईल नष्ट करण्याचे काम करेल. अशा पद्धतीने ही वॉर शिप भारताला इतर देशांच्या मिसाईल आक्रमणापासून वाचविण्याचे काम करते.

असे नाही की अशा प्रकारची युद्धनौका केवळ भारताकडेच आहे. अनेक देशांनी अशा युद्धनौका बनवले आहेत. १९९५-९६ पासून अशा युद्धनौका वापरात येत आहेत. जसे की यूएसएसआर कडे कॉस्मोनाबत युरी गॅगरेन,फ्रेंच नऊ दलाची ए ६०१, चीन युद्धनौका युवांग वांग तसेच अमेरिकेकडे देखील अशा युद्धनौका आहेत. अश्या युद्ध नौका सध्या चार देशांकडे उपलब्ध आहेत. ज्यामध्ये भारत चौथ्या क्रमांकावर आहे. याबाबतीत चीन सर्वात अग्रेसर असून चीन कडे अशा युद्धनौका सर्वाधिक आहेत. चीनकडे अशा युद्धनौका सहा ते सात असल्याचे सांगितले जात आहे. तुलनेत भारताकडे सध्या केवळ एक अशा प्रकारची युद्धनौका आहे तर एका युद्धनौकेवर काम सुरू आहे. अमेरिकेकडे अशा दोन युद्धनौका आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा