भारताने कोरोनाच्या नवीन स्ट्रेनला केले आइसोलेट, भारत बनला पहिला देश

नवी दिल्ली, ३ जानेवारी २०२१: जगातील इतर अनेक देशांप्रमाणेच भारतातही कोरोना साथीच्या नवीन स्ट्रेनची प्रकरणे सातत्याने समोर येत आहेत, परंतु यादरम्यान एक चांगली बातमी समोर आली आहे की, ब्रिटनमधून भारतामध्ये आलेल्या कोरोनाविषाणू च्या नवीन स्ट्रेनचे यशस्वीरित्या निदान झाले आहे. असे करणारा भारत जगातील पहिला देश देखील ठरला आहे.

इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) शनिवारी ट्विट केले की, वेगाने वाढणार्‍या नवीन स्ट्रेनच्या (सार्क-कोव्ह -२ चे यूके-व्हेरियंट) भारताने यशस्वीरित्या ओळखले आहे. भारताने यूके म्युटंट स्ट्रेन्स वेगळे केले आहेत.

आयसीएमआरने अहवाल दिला की, या आइसोलेशनद्वारे तयार केलेल्या कोरोना विषाणूच्या लसीवर नवीन उत्परिवर्तित स्ट्रेनच्या प्रभावाचा तपास करणे उपयुक्त ठरेल. तसेच कोरोना लसीचा या स्ट्रेनवर परिणाम होईल की नाही याचीही तपासणी केली जाऊ शकते.

आयसीएमआरच्या देशभरातील प्रयोगशाळांच्या नेटवर्कच्या माध्यमातून सार्स-कोव्ह -२ विषाणूचा शोध घेण्यात आला होता.

युनायटेड किंगडम, दक्षिण आफ्रिका आणि मध्य पूर्व नंतर कोरोना विषाणूचा नवीन स्ट्रेन भारतात वेगाने पसरताना दिसत आहे. दरम्यान, नवीन स्ट्रेनमुळे देशात अजून ९ लोकांना संसर्ग झाला आहे. भारतात संक्रमित लोकांची एकूण संख्या २९ वर पोहोचली आहे. आतापर्यंत, यूकेमधून परत आलेल्या २९ प्रवाश्यांमध्ये कोरोना विषाणूचा एक नवीन स्ट्रेन सापडला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा