अंडर 19 Asia Cup मध्ये भारताचा पाकिस्तान कडून पराभव

IND vs PAK, U-19 Asia Cup, 26 डिसेंबर 2021: पाकिस्तानने आशिया चषक स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय अंडर-19 संघाचा दोन गडी राखून पराभव केला. श्वास रोखून धरणाऱ्या या सामन्यात पाकिस्तानला शेवटच्या चेंडूवर दोन धावांची गरज होती आणि अहमद खानने शेवटच्या चेंडूवर चौकार मारून पाकिस्तान संघाला विजय मिळवून दिला.

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताचा संपूर्ण संघ 49 षटकांत 237 धावांत गारद झाला. आराध्या यादवने 50, हरनूर सिंगने 46 आणि राजवर्धन हेंगरगेकरने 33 धावांचे योगदान दिले. पाकिस्तानकडून झिशान जमीरने 60 धावांत पाच बळी घेतले.

प्रत्युत्तरात पाकिस्तानला शेवटच्या तीन षटकांत 25 धावा हव्या होत्या आणि चार विकेट्स शिल्लक होत्या. अशा स्थितीत भारतीय गोलंदाजांनी दोन गडी बाद करून सामना जिंकण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, पण अहमद खानच्या खेळीने भारतीय संघाला चपराक दिली.

हा आहे शेवटच्या तीन षटकांचा थरार:

47.1 षटके – 2 धावा
47.2 षटके – 0 धावा
47.3 षटके – 0 धावा
47.4 षटके – 4 धावा
47.5 षटके – 1 धाव
47.6 षटके – विकेट (इरफान खान)

48.1 षटके – 0 धावा
48.2 षटके – 4 धावा
48.3 षटके – 0 धावा
48.4 षटके – 0 धावा
48.5 षटके – 0 धावा
48.6 षटके – 6 धावा

49.1 षटके – विकेट (झीशान जमीर)
49.2 षटके – 1 धाव
49.3 षटके – 1 धाव
49.4 षटके – 2 धावा
49.5 षटके – 2 धावा
49.6 षटके – चार धावा

या पराभवानंतर भारतीय संघ अ गटातील गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. पाकिस्तान संघ चार गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. आता तिसर्‍या साखळी सामन्यात भारताचा सामना सोमवारी अफगाणिस्तानशी होणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा