महाराष्ट्रात पुण्यासह या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, हवामान खात्याचा यलो अलर्ट

पुणे, १० जुलै २०२३: बिपरजॉयनंतर मान्सून देशाच्या अनेक भागांत दाखल झाला. देशभरात मुसळधार पाऊस पडत असताना महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस थांबला आहे. जिथे शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत, तिथे महाराष्ट्रात पावसाने विश्रांती घेतलीय. गेल्या २४ तासांत राज्यातील बऱ्याच भागात फारसा पाऊस झालेला नसून अजूनही चांगला पाऊस न झाल्याने शेतकरीही चिंतेत आहेत.

आज कोकण विभाग आणि कोकण हवामान खात्याने यलो अलर्ट दिला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. तसेच आज विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

नगर, औरंगाबाद, बीड, लातूर आणि सोलापूरमध्ये अजूनही पर्जन्यमान कमी आहे. तिथे शेतकऱ्यांना पावसाची खरी गरज असूनही पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि विदर्भात ११ जुलै रोजी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित महाराष्ट्रात हलका पाऊस पडेल असेही हवामान खात्याने म्हटले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा