सर्वात शक्तिशाली पासपोर्ट असलेल्या देशांच्या यादीत भारत ६९ व्या क्रमांकावर

नवी दिल्ली , ११ डिसेंबर २०२२: आर्टन कॅपिटलने २०२२ मध्ये जगातील सर्वात शक्तिशाली आणि कमकुवत पासपोर्ट असलेल्या देशांची यादी जाहीर केलीय. या यादीत UAE चा पासपोर्ट सर्वात मजबूत असल्याचं सांगण्यात आलंय. या यादीत भारताचा पासपोर्ट ६९ व्या क्रमांकावर आहे. तर पाकिस्तान ९४व्या तर बांगलादेश ९२व्या क्रमांकावर आहे. या यादीवरून हे कळते की कोणत्या देशातील नागरिकांना किती देशात व्हिसा फ्री एंट्री मिळू शकते आणि किती देशांमध्ये व्हिसा ऑन अरायव्हल एन्ट्री दिली जाऊ शकते.

काय आहे भारत आणि पाकिस्तानची स्थिती

आर्टन कॅपिटलनं जारी केलेल्या २०२२ च्या सर्वात शक्तिशाली पासपोर्टच्या यादीत भारत ६९ व्या स्थानावर आहे. भारतीय नागरिक २४ देशांमध्ये व्हिसा फ्री प्रवेश करू शकतात. तर ४८ देशांमध्ये भारतीय नागरिकांना व्हिसा ऑन अरायव्हलची सुविधा मिळणार आहे. १२६ देशांना भेट देण्यासाठी भारतीय नागरिकांना व्हिसाची आवश्यकता असेल.

या यादीत पाकिस्तान ९४ व्या स्थानावर आहे. येथील नागरिकांना फक्त १० देशांमध्ये व्हिसा फ्री एंट्री मिळू शकते. तर १५४ देशांमध्ये प्रवेशासाठी व्हिसा आवश्यक असेल.

दुसऱ्या स्थानावर ११ देश

शक्तिशाली पासपोर्ट असलेल्या देशांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर जर्मनी, इटली, फ्रान्स, स्पेन, लक्झेंबर्ग, उत्तर कोरिया असे १० युरोपीय देश आणि एकूण ११ देशांचा समावेश आहे. या सर्व देशांतील नागरिकांना १२६ देशांमध्ये व्हिसा फ्री प्रवेश मिळू शकतो. व्हिसा ऑन अरायव्हल सुविधा ४७ देशांमध्ये उपलब्ध असेल.

आर्टन कॅपिटलने जाहीर केलेल्या या यादीत अमेरिका आणि ब्रिटन यांना अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर ठेवण्यात आलंय. अमेरिकन नागरिकांना ११६ देशांमध्ये व्हिसा फ्री एंट्री मिळू शकते तर ब्रिटीश नागरिकांना ११८ देशांमध्ये व्हिसा फ्री एन्ट्री मिळू शकते.

टॉप वर UAE आणि सर्वात खाली अफगाणिस्तान

युनायटेड नेशन्समध्ये समाविष्ट केलेल्या १३९ देशांपैकी UAE चा पासपोर्ट २०२२ मध्ये सर्वात शक्तिशाली असल्याचं वर्णन करण्यात आलंय. UAE चे नागरिक १८० देशांमध्ये सहज प्रवेश करू शकतात. १२१ देशांतील नागरिकांना व्हिसा फ्री एंट्री उपलब्ध असेल, तर ५९ देशांमध्ये व्हिसा ऑन अरायव्हल सुविधा उपलब्ध असेल. म्हणजेच ५९ देशांमध्ये UAE च्या नागरिकांना सहज व्हिसा ऑन अरायव्हल मिळणार आहे. UAE च्या नागरिकांना फक्त १८ देशांमध्ये प्रवेश करण्यासाठी अगोदर व्हिसाची आवश्यकता असेल.

त्याच वेळी, आर्टन कॅपिटलनं जारी केलेल्या या यादीत अफगाणिस्तानचा पासपोर्ट सर्वात कमकुवत असल्याचं वर्णन केलंय. अफगाणिस्तानच्या नागरिकांना केवळ ३८ देशांमध्ये व्हिसा मुक्त प्रवेश मिळू शकतो.

हे ३ प्रकारे तयार केले जाते

हा पासपोर्ट निर्देशांक संयुक्त राष्ट्राचे १३९ सदस्य देश आणि त्याच्या ६ वेगवेगळ्या बाबी लक्षात घेऊन तयार करण्यात आलाय. हा निर्देशांक तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी आकडेवारी सरकारद्वारे प्रदान केली जाते. यासोबतच वेळोवेळी क्राउडसोर्सिंगच्या माध्यमातूनही हा डेटा गुप्तपणे शोधला जातो.

सर्व देशांचे पासपोर्ट वैयक्तिक रँक निर्धारित करण्यासाठी त्रि-स्तरीय पद्धत आणि मोबिलिटी स्कोअर (MS) च्या आधारे रेट केले जातात. यामध्ये व्हिसा फ्री (VF), व्हिसा ऑन अरायव्हल (VOA), eTA आणि eVisa यांचाही समावेश आहे. हा स्कोअर नंतर व्हिसा ऑन अरायव्हल आणि संयुक्त राष्ट्र मानव विकास निर्देशांक (UNDP HDI) २०१८ साठी टाय ब्रेकर म्हणून वापरला जातो.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा