इंडिया विरुद्ध आफ्रिका एकदिवसीय मालिकेला आजपासून सुरुवात

मुंबई, ६ ऑक्टोबर २०२२ : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी ट्वेंटी मालिका २-१ ने भारताने जिंकली आहे.आता आज पासून दोन्ही संघातील वनडे मालिका सुरू होणार आहे. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज दुपारी १:३० वाजता लखनऊ येथे खेळवला जाणार आहे.

या मालिकेसाठी भारताने आपला संघ जाहीर केला असून टी ट्वेंटी विश्वचषक जवळ आला असल्याने भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडूंना या मालिकेत विश्रांती दिली गेली आहे. या मालिकेसाठी कर्णधारपद शिखर धवन कडे सोपवण्यात आलं आहे. या अगोदर शिखर धवन ने श्रीलंका, झिम्बाबवे, वेस्टइंडीज दौऱ्यावर भारतीय वनडे क्रिकेट संघाचे नेतृत्व केले आहे. तर या मालिकेसाठी उपकर्णधारपद श्रेयस अय्यर याच्याकडे दिलं गेलं आहे.

टी ट्वेंटी मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघ आता वनडे मालिकाही आपल्या नावावर करण्याच्या इराद्याने मैदानात आज उतरेल, पण हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज (६ ऑक्टोबर) रोजी लखनऊ येथे पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. अशा परिस्थितीत आजच्या मॅच वर परिणाम होऊ शकतो,आता पहिल्या वनडे सामन्यात पाऊस व्यत्यय आणतो का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान पहिला एक दिवसीय सामना आज (६ ऑक्टोबर) लखणऊ येथे खेळवण्यात येणार आहे. तर दुसरा सामना हा( ९ ऑक्टोबर ला) खेळवण्यात येणार आहे, तर या मालिकेतील शेवटचा आणि तिसरा वनडे सामना (११ ऑक्टोबरला) खेळवण्यात येणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा