भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेत भारताची विक्रमी आघाडी; तब्बल २३ वर्षानंतर इंग्लंडला लोळवत जिंकली वनडे मालिका

पुणे, २२ सप्टेंबर २०२२ : भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. टी ट्वेंटी मालिकेत पराभव पत्करल्यानंतर वनडे मालिकेत भारतीय संघ शानदार कामगिरी करताना दिसतोय. भारताच्या महिला क्रिकेट संघाने पहिला एकदिवसीय सामन्यात यजमान इंग्लंडचा पराभव केल्यानंतर दुसरा एक दिवसीय सामन्यात पुन्हा एकदा इंग्लंडच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवत तब्बल ८८ धावांनी पराभव करत मालिका खिशात घातली. तब्बल २३ वर्षानंतर भारतीय महिला संघाने इंग्लंडमध्ये वनडे मालिका जिंकण्याचा कारनामा केला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण इंग्लंड संघाने भारताला दिले. ओपनिंग जोडी पुन्हा एकदा अपयशी ठरल्यानंतर स्मृती मंधना व भाटिया यांनी ५४ धावंची भागीदारी केली.त्या नंतर हरमनप्रीत ने या सामन्यात पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येत आपल्या आक्रमक खेळाचे दर्शन घडवले. आपल्या कारकीर्दीतील १२३ वा सामना खेळत असलेल्या हरमनप्रितने १०० चेंडूमध्ये १२ चौकार व १ षटकाराच्या मदतीने शतक पूर्ण केले.

हरमनप्रीतनं त्यांच्या वनडे कारकिर्दीतील पाचवे शतक झळकावले. कर्णधार म्हणून हे तिचे दुसरे शतक, तर पूर्णवेळ कर्णधार म्हणून तिचे पहिले एकदिवसीय शतक आहे. यापूर्वी तिने २०१३ मध्ये ब्रेबन ला इंग्लंड विरुद्ध नाबाद १०७ धावा केल्या होत्या. यावेळी तिने नाबाद १४३ धावा केल्या. निर्धारित ५० षटकात भारताने ५ बाद ३३३ धावा धावफलकावर लावल्या.

३३३ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात खराब झाली त्यांनी ५४ धावावर तीन विकेट्स गमावल्या. त्यानंतर अनुभवी केप्सी व कर्णधार जोन्स यांनी अर्धशतकी भागीदारी रचली.पण त्यानंतर इतर फलंदाज बाद झाले. अखेर इंग्लंडचा पूर्ण संघ २४५ धावावर बाद झाला व भारतीय संघाने इंग्लंडवर ८८ धावांनी मोठा विजय साकार केला.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा