मुंबई, २४ नोव्हेंबर २०२२ : ‘टी-२०’मध्ये मिळालेल्या यशानंतर टीम इंडिया परत एकदा सज्ज झाली आहे.एकदिवसीय सामन्यांसाठी उद्यापासून टीम इंडियाची न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिका सुरू होत आहे. ऑकलंडमध्ये पहिला एकदिवसीय सामना होणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी सात वाजता हा सामना सुरू होणार आहे. शिखर धवनच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया कशी खेळणार याच्याकडे सर्वच क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे. टीम इंडिया आयसीसीच्या आकडेवारीत एक नंबरला आहे; परंतु टीम इंडियाला पुन्हा एकदा आयसीसीच्या आकडेवारीत एक नंबरला राहायचे असेल तर न्यूझीलंडविरुद्धची मालिका ३-० ने जिंकावी लागणार आहे. त्यासाठी सर्वच खेळाडूंनी विशेष लक्ष देऊन खेळ खेळण्याची गरज आहे.
या एकदिवसीय सामन्यांमध्ये दोन्हीही संघांमधून कोणते खेळाडू खेळणार ते पाहूयात- एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाकडून कर्णधार शिखर धवन, उपकर्णधार व विकेटकीपर ऋषभ पंत, शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, विकेटकिपर संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, शाहाबाज अहमद, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, कुलदीप सेन, उमरान मलिक हे खेळाडू खेळतील. तर न्यूझीलंडच्या संघाकडून कर्णधार केन विल्यम्सन, फिन ॲलन, मायकेल ब्रेसवेल, डेव्हन कॉनवे, लाॅकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरील मिशेल, अॅडम मिलन, जिमी निशम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सॅंटनर आणि टीम साऊथी हे खेळाडू खेळतील.
न्यूझीलंड संघाकडे ११४ गुण असल्याने एकदिवसीय सामन्यामध्ये न्यूझीलंड टीम आकडेवारी पहिल्या नंबरवर आहे. त्याचबरोबर टीम इंडियाकडे ११२ गुण आहेत. याचाच अर्थ टीम इंडियाने न्यूझीलंडचा ३-० असा पराभव केला तर टीम इंडियाकडे अधिक गुण होतील व टीम इंडिया पहिला क्रमांकावर स्थान मिळवेल.
न्यूज अनकट प्रतिनिधी : ऋतुजा पंढरपुरे