भारतीय वायूसेननेचे Mi-17 हेलिकॅाप्टर नुकतचं तामिळनाडूच्या निलगिरी पर्वतरांगांमध्ये क्रॅश झालं आहे. या दुर्घटनेत ४ लोकांचा मृत्यू झाला असून CDS बिपीन रावत , त्यांची पत्नी मधुलिका या दुर्घटनेत जखमी झाली आहे. त्यांना रुग्णालयात भरती केले असून सध्या त्यांच्या प्रकृतीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. आर्मीचा ट्रेनिंग कॅम्प जवळ असल्याने दुर्घटनेनंतर लगेचच त्यांना मदत मिळाली. मात्र अजूनही सद्य परिस्थिती नीटशी समजू शकली नाही. खराब वातावरणामुळे ही दुर्घटना घडली असा प्राथमिक अंदाज आहे. पंतप्रधानांना राजनाथसिंह यांनी या घटनेची माहिती दिली आहे.
तीन्ही दलाचे प्रमुख म्हणजे आर्मी लष्करप्रमुख म्हणजेच चीफ ॲाफ डिफेन्स बिपीन रावत हे या विमानात उपस्थित होते. तिन्ही दलांचे समन्वय साधणारे CDS बिपीन रावत हे पहिले अधिकारी आहेतं . त्यांच्याबरोबर उच्च अधिकारी विमानात हजर होते. अजून नेमका आकडा समजू शकलेला नाही. कुन्नूर येथे हा अपघात झाला असून अनेक प्रश्न त्यामुळे उपस्थित झाले आहेत. MI-17 V5हे अतिउच्च दर्जाचे हेलिकॅाप्टर असून पंतप्रधानांसाठी हेच हेलिकॅाप्टर वापरले जाते.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या संदर्भात ट्विट करुन त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली आहे. लष्करप्रमुखांचे हेलिकॅाप्टर कोसळल्याने ही घटना गंभीर असून वायूसेनेकडून या घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – तृप्ती पारसनीस