जालंधर, दि. ८ मे २०२०: भारतीय हवाई दलाच्या मिग-२९ विमानाला आज सकाळी (दि.८ मे,२०२०) पावणे अकरा वाजता अपघात झाला. जालंधरनजिकच्या हवाई तळावरून प्रशिक्षण मोहिमेसाठी या विमानाचे उड्डाण करण्यात आले होते, त्यावेळीच हा अपघात झाला. या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. विमानामध्ये अचानक तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यामुळे, विमान नियंत्रित करणे वैमानिकाला शक्य झाले नाही. वैमानिक अपघातातून बचावल्याचे वृत्त आहे. या अपघाताची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
वायुसेनेच्या एका प्रवक्त्याने सांगितले की जालंधर च्या जवळ असलेल्या एका वायुसेने च्या हवाई अड्ड्यावर हे विमान प्रशिक्षण अभियानासाठी गेले होते. अधिकाऱ्याने सांगितले की पायलटला हेलिकॉप्टरने वाचविण्यात आले व अपघाताचे कारण शोधण्यासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरी यांना आदेश देण्यात आले आहेत. साक्षीदारांनी सांगितले की, सकाळी अकराच्या सुमारास शेतांच्या बाजूला एक आगीचा गोळा येताना दिसला. तो जमिनीवर आदळला आणि तीव्र स्फोट झाला. विमान कोसळले तेथे कोणीच हजर नव्हते त्यामुळे मोठा अपघात झाला.
याआधी देखील ही विमाने कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. ही विमाने खूप जुनी झाली आहेत त्यामुळे त्यांच्या मध्ये वारंवार तांत्रिक अडचणी निर्माण होत आल्या आहेत याला अनुसरून भारताने वारंवार या विमानांमध्ये अपग्रेडेशन केले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी