एलओसीजवळ भारतीय लष्कराने तीन दहशतवाद्यांना पकडले….

जम्मू काश्मीर, ३१ मे २०२३ : जम्मू-काश्मीरमधील करमर्हा सेक्टरमध्ये एलओसीजवळ भारतीय लष्कराने तीन दहशतवाद्यांना पकडले. हे तिघे ३० मे च्या रात्री खराब हवामान आणि पावसाचा फायदा घेत भारतीय सीमेत घुसखोरीचा प्रयत्न करत होते. कुंपण ओलांडून जाणाऱ्या तीन दहशतवाद्यांवर लष्कराच्या जवानांनी गोळीबार केला.

लष्कराने त्यांच्याकडून १० किलो IED, AK-४७ आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि ड्रग्ज जप्त केले आहेत. गोळीबारात जखमी झालेल्या एका दहशतवाद्यावर पुंछ येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अजून ही या परिसरात शोध मोहीम सुरू आहे. मंगळवारी रात्री नियंत्रण रेषेवर झालेल्या हालचालींनंतर लष्कराने शोधमोहीम सुरू केली. पूंछच्या गुलपूर भागात नियंत्रण रेषेजवळ लष्कराच्या संशयास्पद हालचाली लक्षात आल्या. यानंतर जवानांनी शोधमोहीम सुरू केली. लष्कराची कारवाई पाहून दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला, प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात एक घुसखोर जखमी झाला. गेल्या महिन्यातही ४ दहशतवादी घुसखोरी करताना ठार झाले होते.

बारामुल्लामधील वानीगम पायीन क्रेरी भागात गुरुवारी सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. पोलिस आणि लष्कराची ही संयुक्त कारवाई होती. केंद्रीय राखीव पोलीस आणि जम्मू-काश्मीर पोलीस यांनी संयुक्तपणे चालवले होते. दहशतवाद्यांकडून १ एके-४७, १ पिस्तूल आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.

या कारवाईच्या एक दिवस आधी माछिल सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न लष्कराकडून हाणून पाडण्यात आला होता. या कारवाईत दोन दहशतवादीही ठार झाले होते. दहशतवाद्यांनी नियंत्रण रेषेजवळून घुसखोरीचा प्रयत्न केला होता.

एप्रिलमध्ये पुंछ हल्ल्यात ५ जवान शहीद झाले होते, २० एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी पुंछमध्ये लष्कराच्या ताफ्याला लक्ष्य केले होते, ज्यात पाच जवान शहीद झाले होते. ग्रेनेड हल्ला आणि गोळीबारामुळे ट्रकने पेट घेतला. या हल्ल्याची जबाबदारी पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट (PAFF) या दहशतवादी संघटनेने स्वीकारली होती. त्यानंतर पुन्हा हल्ला करण्याची धमकीही दिली. PAFF ही जैश-ए-मोहम्मदची उपकंपनी आहे. कलम ३७० रद्द केल्यानंतर, PAFF जैशची प्रॉक्सी संघटना म्हणून उदयास आली.

न्युज अनकट प्रतिनिधी : निखील जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा