अरुणाचल प्रदेशात कोसळलं भारतीय लष्कराचं हेलिकॉप्टर, शोध मोहीम सुरू

अरूणाचल प्रदेश, १६ मार्च २०२३: आज सकाळी भारतीय लष्कराचं चित्ता हेलिकॉप्टर ऑपरेशन करत असताना त्याचा हवाई वाहतूक नियंत्रणाशी संपर्क तुटला आणि मंडला येथे त्याचा अपघात झाला. भारतीय लष्कराचं चित्ता हेलिकॉप्टर अरुणाचल प्रदेशच्या डोंगराळ भागात खाली पडलं. अरुणाचल प्रदेशातील बोमडिला शहराच्या पश्चिमेकडील मंडलाजवळ ही घटना घडल्याचं सांगण्यात येतंय. या दुर्दैवी घटनेत हेलिकॉप्टरमधील दोन वैमानिकांना शोधण्याचं कार्य सुरु आहे.

गुवाहाटी चे जनसंपर्क अधिकारी लेफ्टिनेंट कर्नल महेंद्र रावत यांनी सांगीतलं की, “सकाळी ९.१५ च्या सुमारास अरुणाचल प्रदेशातील बोमडिलाजवळ कार्यरत असलेल्या आर्मी एव्हिएशन चीता हेलिकॉप्टरचा एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क तुटला आणि मंडला येथे अपघात झाला. अपघाताच्या वेळी हेलिकॉप्टरमध्ये पायलट आणि को पायलट होते”.

हेलिकॉप्टरने कामेंग जिल्ह्यातील सेंग गावातून सकाळी ९ वाजता उड्डाण केलं होतं आणि ते आसाममधील मिसामरी येथे जात होतं. त्याच्या आगमनाची अंदाजे वेळ सकाळी ९.४५ ची होती.

अरुणाचल प्रदेश पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टर मध्ये दोन पायलट होते. लष्कर, एस. एस. बी. आणि पोलिसांची शोध आणि बचाव पथकं घटनास्थळी रवाना झाली आहेत. सध्या या भागात सिग्नल नसल्यामुळं कोणतेही फोटो उपलब्ध नाहीत. आणी तिथं कमाललीचं धुकं आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधि: केतकी कालेकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा