भारतीय कंपनीने आणली जगातील सर्वात स्वस्त रेमडेसिविर

इंदापूर, दि. ९ जुलै २०२०: मंगळवारी भारतरत्न, घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबई येथील निवास्थान असणाऱ्या राजगृहावर अज्ञात इसमांकडून हल्ला करत तोडफोड करण्यात आली. ज्या वास्तूत इतिहास घडला, बाबासाहेबांनी आपल्या पुस्तकांसाठी ज्या वास्तूची उभारणी केली, जिथे जगभरातील आंबेडकरी अनुयायी येथे दररोज भेटीला येत असतात.इतकं महत्त्वाचे स्थान असणाऱ्या या पवित्र ठिकाणी, असं नीच कृत्य घडावं हीच खरी शोकांतिका. या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज पीपल्स रिपब्लिकन पार्टी यांच्यावतीने, इंदापूर तालुका मागासवर्गीय समाजबांधव पळसदेव यांनी इंदापूर पोलीस स्टेशन येथे पोलिस निरीक्षक नारायण सारंगकर यांना निवेदन देत, या घटनेची सखोल चौकशी होत, गुन्हेगारांना शिक्षा व्हावी हि मागणी करण्यात आलेली आहे.

घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे लाखो भारतीयांचे प्रेरणास्थान असून, बहुजन अस्मितेशी निगडीत ज्याकाही वास्तू आहे, त्यापैकीच एक असणा-या राजगृह या बाबासाहेबांचे वास्तव्य असणाऱ्या वास्तूवर जे हिडीस कृत्त्य झाले. या घटनेचा, बाबासाहेबांचा अनुयायी व या देशाचा एक नागरिक म्हणून मी निषेध व्यक्त करतो. तसेच या घटनेतील गुन्हेगारांना योग्य ते शासन व्हायलाच हवे हि मागणी मा. बांधकाम व आरोग्य समिती सभापती, तथा पुणे जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने यांनी केली.

त्या समाज कंटकांना जर बाबासाहेब समजले असते तर राजगृहाच्या आवारातील कुंड्या व इतर मालमात्तेची नासधूस न करता त्यांनी त्यातली पुस्तकं वाचली असती, परंतु अशा या हीन कृत्त्यातून त्यांची विचारसरणी सामोरी येत असून, याप्रकरच्या प्रवृत्तींविरोधात बाबासाहेबांनी दिलेली शिकवण आम्हाला लढण्यासाठी ,आमच्या सामजिक जाणिवा आम्हाला सातत्याने प्रवृत्त करत राहतील असे मत यावेळी माने यांनी व्यक्त केले.

आज इंदापूर पोलीस स्टेशन येथे जे निवेदन देण्यात आले या प्रसंगी पश्चिम महाराष्ट्र पिपल्स रिपब्लिकन पार्टी अध्यक्ष संजय सोनवणे ,मेघराज कुचेकर, नितीन आरडे, विकास भोसले, अभिजित गायकवाड, कैलास भोसले, मिथुन भोसले, अंकुश भोसले, महेंद्र सोनवणे, आगंत गायकवाड, अनंता बोडके, दादासाहेब शेंडे व मान्यवर उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा